कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 200 पार...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

पॉझिटिव्ह आलेले सर्वजण मुंबई, पुणे, सोलापूरसह इतर रेडझोन जिल्ह्यातून आलेले आहेत.

कोल्हापूर - जिल्ह्यात आज सकाळी 1368 लोकांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिलासा मिळाला असताना आज सायंकाळी साडे चार ला आणखी 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 209 वर पोचली आहे. आज पॉझिटिव्ह आलेले सर्वजण मुंबई, पुणे, सोलापूरसह इतर रेडझोन जिल्ह्यातून आलेले आहेत. या सर्वांना यापूर्वीच क्वारंटाईन केले होते. आता त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी हलविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patient found kolhapur