esakal | धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यात परत कोरोनाचा कहर सुरु ; 23 नवे कोरोना बाधित आले समोर...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona positive patient found in kolhapur

जिल्‍ह्यात आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 927 झाली आहे.

धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यात परत कोरोनाचा कहर सुरु ; 23 नवे कोरोना बाधित आले समोर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाच आज संध्याकाळी प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात एकुण 23 नवे कोरोना बाधित रुग्ण समोर आल्याने खळबळ माजली आहे.या बाधितात चंदगड तालुक्यातील दहा, हातकणंगले - चार, आजरा - तीन, करवीर व गडहिंग्लज प्रत्येकी दोन, शिरोळ व कोल्हापूर शहर प्रत्येकी एक अशा रुग्णांची भर पडली आहे.

जिल्‍ह्यात आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 927 झाली आहे. दिवसभरात तीन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यांची संख्या आता 732 झाली आहे. एकूण 160 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.  मध्‍यरात्री आलेल्या अहवालामध्ये कोल्हापूर शहरातील सातजणांचा समावेश आहे. त्यात राजोपाध्येनगर मधील एक, न्यू शाहूपुरी एक, राजारामपुरी दोन व अन्य तिघांचा समावेश आहे.

वाचा - कोल्हापूर एसटी महामंडळ हादरले ; सलग दुसऱ्या दिवशी दुसरा पाॅझिटिव्ह

शहरी भागात चिंता वाढली

दीड महिन्यापूर्वी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, तेव्हा मुंबईतील अनेक लोक कोल्हापूरला आले. यात शाहूवाडी, आजरा, चंदगड, भुदरगड, पन्हाळा या डोंगरी तालुक्‍यातील सर्वाधिक व्यक्ती होत्या. त्यातील अनेक जण पॉझिटिव्ह होते. ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु चंदगड, आजरा तालुक्यात रुग्णांची संख्या परत वाढत आहे.