गडहिंग्लज, आजरा, चंदगडमधील 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील जनतेसाठी आजची पहाट गुड न्यूज घेऊन आली. दिल्लीचा प्रवास करून तिन्ही तालुक्‍यातील विविध गावांत आलेल्या 13 जणांचे स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांनी आज सांगितले. 

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील जनतेसाठी आजची पहाट गुड न्यूज घेऊन आली. दिल्लीचा प्रवास करून तिन्ही तालुक्‍यातील विविध गावांत आलेल्या 13 जणांचे स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांनी आज सांगितले. 

नेसरी व कडलगे (ता. गडहिग्लज) येथील प्रत्येकी एक, चंदगड तालुक्‍यातील 10 आणि आजऱ्यातील एकाचा स्वॅब उपजिल्हा रुग्णालयातून 7 एप्रिल रोजी पाठविण्यात आला होता. बुधवारी रात्री उशिरा या सर्वांचा अहवाल प्राप्त झाला. आज सकाळी हा अहवाल निगेटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. हे सर्व जण फेब्रुवारी महिन्यात दिल्लीचा प्रवास करून गावाकडे परतले होते. 
नेसरीतील त्या प्रवाशाच्या नातेवाईकांनाही क्‍वारंटाईन केले होते. त्यांना आता घरी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, ज्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते त्या सर्वाना त्या-त्या तालुक्‍यात चौदा दिवस संस्थात्मक कॉरंटाईन करण्याचा निर्णय होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. 

आजरेकरांना दिलासा 
आजरा ः दिल्ली येथील तबलीगला गेलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आजरेकरांना मोठा दिलासा मिळाला. अनेकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. त्यामुळे शहर व तालुक्‍यात पसरलेली भीती दूर झाली. संबंधित राहत असलेली गल्ली प्रशासनाकडून "ब्लॉक' केली होती. शहरातून जाणारा महागाव मार्गावरील अर्धा किलोमीटरचा परिसर सील केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Report of 13 people in Gadhinglaj, Ajara, Chandgad negative