कसा कोरोना व्हायरस आला ओ... कोल्हापूरच्या शेतमजूर महिलांनी गायिलेले गीत सोशल मिडियावर व्हायरल

corona songs sung by women farmers in Kolhapur go viral on social media
corona songs sung by women farmers in Kolhapur go viral on social media

चुये (कोल्हापूर) - येथील शेतमजूर महिलांनी देशांमध्ये कोरोनाचा प्रसार कसा झाला आणि त्याबद्दल घ्यायची काळजी कोणती आहे यासंदर्भात सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे गीत गायले आहे याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

कसे आहे हे गीत पाहा या व्हिडीओच्या माध्यमातून....

यामध्ये मंगल कांबळे, नानुबाई देवकुळे, पदमा व्हनाळकर व कमल देवकुळे या चार शेतमजूर महिलांनी गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतमजुरी करत असताना दुपारच्या सुट्टीच्या काळात कोरोना गीत गायले आहे. या गीतामध्ये त्यांनी चीन देशांपासून भारतामध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगितले. हे सांगत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन सुरू केला आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जनतेने या काळात  काय करायला पाहिजे याची विनंती केली आहे याचा आवर्जून उल्लेख केला आहे.या गीताची सर्व सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.  

संपादन - मतीन शेख
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com