आता बेळगावात 'या' ठिकाणी होणार कोरोनाची तपासणी...

Corona test to begin in Belgaum
Corona test to begin in Belgaum

बेळगाव - इंडीयन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च या संस्थेच्या बेळगाव शाखेत कोरोनाची प्रयोगशाळा सुरू होणार आहे. त्यासाठी इंडीयन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चकडून मंजुरीही देण्यात आली आहे. येथील केएलई हॉस्पीटल रोडवर या संस्थेची इमारत आहे. सध्या कोरोनाच्या तपासणीसाठी संशयीतांच्या घशातील स्त्राव हुबळी व अन्य दहा ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. पण बेळगावातच प्रयोगशाळा झाली की मग स्त्राव अन्यत्र पाठविण्याची गरज भासणार नाही. शिवाय अहवालही तातडीने उपलब्ध होणार आहे. पण आता प्रशासनाकडून तेथे आवश्‍यक उपकरणांची उपलब्धता तातडीने करून देण्याची आवश्‍यकता आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या तपासणीसाठी राज्यात सध्या 11 प्रयोगशाळा आहेत. प्रारंभी बेळगावातील संशयीतांच्या घशातील स्त्राव शिमोगा येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. उत्तर कर्नाटकात प्रयोगशाळा हवी अशी मागणी त्यावेळी झाली. बेळगावात प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णयही झाला. पण ऐनवेळी बेळगाव ऐवजी हुबळी येथे प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. बेळगावात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेळगावात आता कोरोनाचे 36 रूग्ण आहेत. त्यांच्याशी संबंधित क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्याही वाढली आहे. त्या सर्वांची तपासणी करण्यासाठी बेळगावात स्वतंत्र प्रयोगशाळा हवी अशी मागणी पुढे येत होते.

इंडीयन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च या संस्थेची बेळगावात शाखा आहे. येथे भारतीय पारंपारीक व आयुर्वेदीक औषधांवर संशोधन केले जाते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिशनल मेडीसिन या नावाने येथे एक उपशाखा चालविली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे पारंपारीक औषधांवर संशोधन सुरू आहे. या ठिकाणी व्हायरॉलॉजी लॅबरॉटरी (प्रयोगशाळा) आहे. त्या प्रयोगशाळेचा वापर कोरोना प्रयोगाशाळा म्हणून करण्याची मागणी प्रशासनाकडून झाली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे.

 बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारावरच असलेली ही संस्था फारशी चर्चेत नसते. गतवर्षी त्या ठिकाणी औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. त्यामुळे संस्था चर्चेत आली होती. आता कोरोना व तेथील प्रयोगशाळेच्या निमित्ताने ही संस्था चर्चेत आली आहे. आजवर या संस्थेचे महत्व बेळगावकरांना कळले नव्हते. तेथे नेमके कोणते संशोधन चालते याबाबतही बेळगावकर अनभिज्ञ होते. पण आता कोरोनाच्या संकटाच्या छायेत ही संस्था जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी पुढे आली आहे. येथील प्रयोगशाळेत तपासणी सुरू झाल्यानंतर अहवाल लवकर येतील. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना तपासणीचा वेगही वाढेल.

आयसीएमआर येथील प्रयोगशाळेचा कोरोनासाठी वापर करण्यास परवानी मिळाली आहे. लवकरच त्या प्रयोगशाळेचा वापर सुरू केला जाणार आहे. 

डॉ. संजय डूमगोळ. - आरोग्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com