नृसिंहवाडीत दत्त देवाचे दर्शन स्टॅरिलियन लावल्यानंतरच...

coronavirus impact in nurshihwadi  kolhapur marathi news
coronavirus impact in nurshihwadi kolhapur marathi news
Updated on

नृसिंहवाडी (कोल्हापूर) : येथील दत्त देवस्थानतर्फे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हाताला स्टॅरिलियन औषध लावून मगच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. अनेकांना कोरोना माहितीपत्रक दिले असून, ठिकठिकाणी डिजिटल फलक उभे केले आहेत. कर्मचारी वर्गाला मास्क घालणे बंधनकारक केले आहे. परिसराच्या स्वच्छतेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. 

नृसिंहवाडीत भाविकांना स्टॅरिलियन औषध

दत्त देव संस्थानचे अध्यक्ष अशोकराव पुजारी, विश्वस्त अमोल विभुते, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे, डॉ. किरण आणुजे, किरण पवार, सतीश मलमे, सरपंच जयश्री खिरूगडे आदीच्या उपस्थितीत प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला.  कोरोना साथीच्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर दत्त देव संस्थान,  ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व नर्सिग कॉलेज ऑफ कुरुंदवाड, खासगी वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते भाविकांना औषध लावून कोरोना प्रबोधन पत्रक दिले.


या वेळी डॉ. पाखरे यांनी कोरोना आजाराबाबत उपाययोजना सांगितले. डॉ. किरण आणुजे यांनी आजाराची लक्षणे सांगितली.
सचिव अमोल विभूते, उपसरपंच गुरूदास खोचरे, कृष्णा गवंडी, तुषार जुगळे व सॅम्युअल मोरे, विकास पुजारी, विनोद पुजारी प्रा. गुंडो पुजारी, प्रमोद पट्टेकरी, प्रशांत कोडणीकर यांनी संयुक्तपणे संयोजन केले.


दिवसभरात दोन हजारांवर भाविकांच्या हाताला औषध
अशोकराव पुजारी म्हणाले, ‘सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकही रुग्ण नाही, तरीही तीर्थक्षेत्र म्हणून भाविकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यासाठी दत्त देवस्थानने पुढाकार घेत भाविकांसाठी स्टरिलियन औषध लावणे सुरू केले आहे. दिवसभरात दोन हजारांहून अधिक भाविकांना हाताला औषध लावले गेले. माहिती पत्रक वाटले. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून दत्त मंदिर परिसर दिवसातून दोन वेळा स्वच्छ  धुवून घेतले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com