court has directed to file an fir against kangana ranaut
court has directed to file an fir against kangana ranaut

कंगणाचा पाय खोलात ; एफआयआर दाखल करून घेण्याचे न्यायालयाचे निर्देश  

बंगळूर - ट्‌वीटरवरून कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका करणे अभिनेत्री कंगणा राणावत हिला महागात पडले आहे. तुमकूर प्रथम श्रेणी न्यायालयाने तीच्या विरोधात एफआयआर दाखल करून घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. 

देशभरात कृषी कायद्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. अभिनेत्री कंगणा हिने त्याविरोधात शेतकऱ्यांना लक्ष करीत ट्‌वीटरवरून शेतकऱ्यांवर टीका केली होती. याबाबत तुमकूरचे ऍड. एल. रमेश यांनी तुमकूर प्रथम श्रेणी न्यायालयात सीआरपीसी कलम 156 (3) अंतर्गत तपास करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुणावणी घेताना न्यायालयाने कंगणा विरोधात एफआयआर दाखल करून घेण्याचे निर्देश तुमकूर पोलिंसांना दिले आहेत. 

कंगणा हिने 21 सप्टेंबर रोजी ट्‌वीट करीत, ज्या लोकांनी भारतीय नागरीकत्व विधेयकाबद्दल (सीएए) चुकीची माहिती व अफवा परसवत दंगा घडवून आणला, आता तेच लोक शेतकरी विधेयकाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत आणि देशात दहशत पसरवत आहेत. ते दहशतवादी आहेत, असे म्हटले होते.

 या ट्विटवर आक्षेत घेत ऍड. रमेश यांनी 28 सप्टेंबर रोजी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात त्यांनी बाजू मांडताना, हे ट्विट म्हणजे चिथावणी देणारे असून ,दोन गटांमध्ये शत्रुत्व भावना निर्माण करणारे आहे. यातून हेतूपुरस्सर अवमान करण्यात आला असल्याचा आरोप करीत देशातील सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अभिनेत्री कंगणा विरोधात पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यासाठीची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अभिनेत्री कंगणाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com