esakal | कोल्हापुरात कोविशिल्ड लसीकरण 16 रूग्णालयांना मान्यता

बोलून बातमी शोधा

Covishield vaccination approved in 16 hospitals in Kolhapur}

कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीकरणाला गेल्या महिन्याभरापासून सुरवात झाली

कोल्हापुरात कोविशिल्ड लसीकरण 16 रूग्णालयांना मान्यता
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना महात्मा फुले, जनआरोग्या योजना सुरू असलेल्या जिल्ह्यातील 16 खासगी रूग्णालयात कोविशिल्ड लसीकरण देण्याची सुविधा देण्यास मान्यता मिळाली आहे, त्यानुसार 250 रूपये शुल्क भरून या लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. ही सुविधा येत्या सोमवारपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे. 

कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीकरणाला गेल्या महिन्याभरापासून सुरवात झाली. यात पहिल्या टप्प्यात शासकीय आरोग्य विभागातील डॉक्‍टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना कोविशिल्डचे लसीकरण झाले. त्यापाठोपाठ आता सुरक्षा कर्मचारी तसेच 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती तर तसेच 60 वर्षावरील व्यक्तीना कोविशिल्ड लसीकरण सुरू झाले त्या शासकीय रूग्णालयातही लस मोफत मिळते. 

त्यापाठोपाठ आता खासगी रूग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविल्या जातात त्या खासगी रूग्णालयांना कोविशिल्ड लस देण्याची मान्यता दिली आहे. त्यानुसार ज्या रूग्णालयात लसीकरणासाठी तीन कक्ष, डॉक्‍टर्स, परिचारीका, शीतकरणपेट्या लसीकरण पुरक सुविधा येत्या दोन दिवसात पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष सोमवारपासून लसीकरण सुरू होईल. त्यासाठी ज्यांना हे लसीकरण घ्यायचे आहे. त्यांना ऑनलाईन किंवा थेट रूग्णालयात पूर्व नोंदणी येथे करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. 

7 हजारांवर व्यक्ती लसीकरण 
जिल्हाभरात आज जवळपास 7 हजारांवर व्यक्तीना लसीकरण करून घेतले यात शहरातील जवळपास एक हजारावरील व्यक्तींचा समावेश आहे. यात 60 वर्षावरील व्यक्ती तसेच 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्तींचा सामेवश आहे. 

 संपादन - धनाजी सुर्वे