सीपीआर;येणाऱ्यांची घालमेल, यंत्रणेवर ताण 

सीपीआर;येणाऱ्यांची घालमेल, यंत्रणेवर ताण 
Updated on

कोल्हापूर : दूर अंतराचा प्रवास त्यात तपासणीसाठी वेटिंग, रडणाऱ्या लहान मुलांची समजूत काढताना आईची होणारी घालमेल, असे वातावरण सीपीआर परिसरात अनुभवत आहे. आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण, प्रत्येकाला उत्तर देताना होणारी दमछाक यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण प्रकर्षाने जाणवतो. 


पुण्या-मुंबईसह परजिल्ह्यातून येणाऱ्यांच्या वाहनांची महामार्गावर गर्दी वाढली आहे. मुंबई ठाण्याहून बाहेर पडताना सात ते आठ तासांत कोल्हापूरचा प्रवास पूर्ण होईल, अशी अटकळ बांधली जाते. प्रत्यक्षात महामार्गावरील वाहनांची गर्दी पाहता आता प्रवासाची वेळ वाढू लागली आहे.

किणी टोल नाक्‍यावर फिट फॉर ट्रॅव्हलच्या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, अथवा आयसोलेशनचा पर्याय दिला जातो. मुंबई पुणे, ठाणे, तसेच अन्य रेडझोनमधून कुणी आले तर सक्तीने स्वॅब घेतला जातो. 

सीपीआरच्या आवारात वेगवेगळे तपासणी कक्ष स्थापन केले आहेत. एकापाठोपाठ एक लोक परगावाहून दाखल होतात. कागदपत्रांची पूर्तता. स्वॅब, होम तसेच इन्स्टिट्यूशन क्वारंनटाईनचा शिक्का मारला जातो. फॉर्मवर "एचक्‍यू' असे लिहले, की संबंधिताला होम क्वारंनटाईनची परवानगी दिली जाते.

कागदपत्रांची पूर्तता करताना दमछाक होते, मात्र कोरोनाने हातपाय पसरू नये, यासाठी ही दक्षता ही महत्त्वाची ठरते. 
लहान मुले सोबत असतील तर पालकांची अस्वस्थता अधिकच वाढते. प्रवासाचा ताण त्यात उकाडा आणि भुकेने व्याकूळ झालेली लहान मुले पाहताना आरोग्य कर्मचारी तसेच बंदोबस्तावरील पोलिसही अस्वस्थ होतात, मात्र प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय बाहेर जाण्यास परवानगी नसल्याने रडणारी मुले पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही. ज्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंनटाईन होणार त्यांना आपल्याला नेमके कुठे नेणार? याची माहिती नसते. केएमटी बस येते आणि त्यांना ज्या ठिकाणी विलगीकरण करायचे आहे, तिकडे घेऊन जाते. ज्यांच्या हातावर होमक्वारंनटाईनचा शिक्का बसतो, अशा लोकांना घरची ओढ असते. कोल्हापुरात बऱ्याच दिवसांनी पाहिल्यानंतर त्यांच्या घरच्या मंडळीच्या आनंदाला मात्र पारावर उरला नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com