
कोल्हापूर ः दीड महिन्यात सीपीआरमधील कोरोनाबाधितांवर उपचार करणारे 25 डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे ते उपचार सेवेत नाहीत. 15 वरिष्ठ डॉक्टर प्रशासकीय कामात गुंतले आहेत. अशा स्थितीत सीपीआरमध्ये बेड आहेत. ऑक्सिजन बेडची सोय चांगली आहे. पण गंभीरबाधितांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्यावर उपचार सेवेसाठी वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर नाहीत. म्हणून खासगी डॉक्टरांनी सीपीआरमध्ये उपचारसेवा द्यावी, असा प्रस्ताव अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे. मात्र अपवाद वगळता कोणीही आलेले नाही, हे वास्तव आहे.
जिल्ह्यात सुमारे बाराशेहून अधिक नोंदणीकृत खासगी रुग्णालय आहेत, बहुतेक ठिकाणी एमडी, एमएस, डीजीओ, अर्थो, मेंदू पोट विकार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञांपासून ते हृदयविकार तज्ज्ञांपर्यंतचे खासगी डॉक्टर प्रॅक्टीस करतात. यातील 40 टक्के रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार होतात. उर्वरीत 60 टक्के खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार होत नाहीत. त्या डॉक्टरांकडे सद्या काही अंशी वेळ आहे. यातील किमान 50 डॉक्टरांनी आठवड्यातून दोन दिवस सीपीआरमध्ये उपचार सेवा दिली. तर सीपीआरची वैद्यकीय सेवा प्रभावी होण्यास मदत होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर मेडीकल असोसिएसनचे यापूर्वी असा प्रयत्न जरूर केले आहेत. मात्र, त्यालाही मर्यादा होत्या. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रोजची संख्या 400 च्या पुढे आहे. यातील सौम्यबाधितांवर ग्रामीण भागात उपचार होतात. बहुतेक गंभीर रुग्ण सीपीआरमध्ये येतात अनेक रुग्णांची स्थिती अशी की, मानसिकदृष्ठ्या खचलेले, दुर्दम्य आजारांची तीव्र लक्षणे असलेले, एखादा अवयव पूर्ण निकामी झालेला, हालचाली क्षीण झालेल्या अशी अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला स्वच्छ करण्यापासून ते कोरोनासह अन्य आजार शोधून त्याच्यावर उपचार करावे लागतात. तर उर्वरीत गंभीर आजारी रुग्णांची संख्या 80 पुढे आहे.
या सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी 50 विविध शाखांचे तज्ज्ञ स्पेशालिटीच्या डॉक्टरांची मदत हवी आहे. सीपीआरमध्ये इतके डॉक्टर उपलब्ध नाहीत. हृदयरोग विभागातील चार डॉक्टर एका वेळी 35 रुग्णांना सेवा देत आहेत. मेडीसीन विभागाचे पाच डॉक्टरही तेवढ्याच रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रूग्णांवर वैयक्तीक लक्ष देण्यावरही मर्यादा पडते. अशा वेळी इंटरशिपच्या डॉक्टरांची मदत घेऊन उपचार केले जात आहेत.
या शाखांच्या डॉक्टरांची गरज
एमडी मेडीसीन, फप्फुस विकार तज्ज्ञ, उरोरोग तज्ञ, क्षयरोग तज्ञ, भूल तज्ञ, हृदयविकार तज्ञ, मनोविकार तज्ञ या डॉक्टरांची सेवा गंभीर रूग्णांवर उपचारासाठी येथे तातडीने आवश्यक आहे. याशिवाय सौम्य बाधितांवर उपचारासाठी एमबीबीएस डॉक्टरांची सेवाही तितकीच महत्वाची आहे. अशी माहिती सीपीआरच्या वरिष्ठ डॉक्टरांकडून देण्यात आली.
- संपादन ः यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.