गर्भपातास नकार दिल्याने डॉक्‍टरला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

काय काम आहे, असे विचारल्यावर एका महिलेचा गर्भपात करायचा असल्याचे सांगितले.

चंदगड (कोल्हापूर) :  हेरे (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत गणपती कांबळे यांना संशयित प्रदीप गुरव (रा. सुळये, ता. चंदगड) याने दवाखान्यात येऊन मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार येथील पोलिसांत दाखल झाली आहे.

डॉ. कांबळे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बाह्यरुग्ण तपासणी करीत असताना संशयीत गुरव त्यांच्या केबीनमध्ये परवानगी न घेताच आला. काय काम आहे, असे विचारल्यावर एका महिलेचा गर्भपात करायचा असल्याचे सांगितले.

हेही वाचा- कोल्हापुरात आता  २३ मजली इमारतीचा मार्ग मोकळा -

डॉ. कांबळे यांनी त्याला नकार दिल्यावर त्याने त्यांचे नाव विचारून घेतले.नाव सांगताच त्यांना जातिवाचक शिविगाळ केली. त्यांचे कॉलर पकडून कानशिलात मारली. नर्स व इतर सहकाऱ्यांनी गुरव याची समजूत घालून त्याला दवाखान्यातून बाहेर काढले. दरम्यान, हा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठांच्या सुचनेनुसार डॉ. कांबळे यांनी येथील पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

संपादन अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case chandgad doctor for refusing an abortion