बेलेवाडीत पाच एकरातील ऊस गव्यांकडून फस्त 

अशोक तोरस्कर
Thursday, 4 March 2021

बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथे गव्यांच्या कळपाचा उपद्रव सुरू झाला आहे. हा कळप ऊस, भाजीपाला पिकात धुमाकूळ घालत आहेत.

उत्तूर : बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथे गव्यांच्या कळपाचा उपद्रव सुरू झाला आहे. हा कळप ऊस, भाजीपाला पिकात धुमाकूळ घालत आहेत. गव्याच्या कळपाने येथील दहा शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे. सुमारे पाच एकर क्षेत्रातील ऊस खाऊन व तुडवून टाकला आहे. सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गावातील या शेतकऱ्यांची आंब्याचा ओढा नावाच्या परिसरात शेती आहे.

येथे त्यांनी ऊस पिक घेतले आहे. या ऊस पिकात रात्री आठच्या सुमाराला गव्यांचा कळप उतरला. या कळपाने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांची लावणही गव्यांनी फस्त केली आहे.

हे गवे जोमकाई देवी जंगल परिसरातून येत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांनी याबाबत संपर्क साधला आहे. दोन दिवसात या परिसराची पाहणी करुन त्याचा आहवाल वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहे. 

भरपाई द्यावी
कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यात वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. वन विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. 
- मेघाताई तोरस्कर, ग्रामपंचायत सदस्या, बेलेवाडी 

या शेतकऱ्यांना फटका 
संतोष साळोखे,धोंडीबा साळोखे, चंद्रकांत तोरस्कर ,दत्तात्रय तोरस्कर ,शशिकांत तोरस्कर , धोंडीराम तांबेकर अशोक निकाडे, पांडूरंग कुदळे, आनंदा तोरस्कर, सात्तापा तोरस्कर. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage To Five Acres Of Sugarcane In Belewadi Kolhapur Marathi News