सावधान : धोका कायमच , डिसेंबरमध्ये कोरोनावाढीची शक्‍यता

danger persists possibility of covid 19  growth in December Predictions of experts from india  and abroad
danger persists possibility of covid 19 growth in December Predictions of experts from india and abroad

कोल्हापूर : देश-विदेशांतील कोरोना रुग्णांची अवस्था पाहता, घसरलेला रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संपला, असे म्हणून चालणार नाही, तो पुन्हा डोके वर काढू शकतो, याचाही विचार नागरिकांनी केला पाहिजे. सणासुदीचे दिवस असल्याने सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न वापरणे, सॅनिटायझर न वापरणे यातून कमी होणारी रुग्णसंख्या वाढणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.


चीनमध्ये विनाउपचार कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. पाहता पाहता अवघ्या सहा-सात महिन्यांत ही स्थिती कोल्हापुरात आली. 
देश-विदेशात कोरोना पूर्वीच पोचला होता. त्या देशांचा विचार करता रुग्णांचा आकडा मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी आला होता, तेथे पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. हीच स्थिती देशात आणि राज्यात येऊ शकते, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.


फ्रान्समध्ये एप्रिलमध्ये सुमारे १० हजारांच्या आसपास रुग्ण होते. मेमध्ये हा आकडा शंभरपर्यंत आला होता, मात्र पुन्हा १४ ऑक्‍टोबरपर्यंत तो २२ हजार ५९१ पर्यंत गेला. अशीच स्थिती इग्लंडमध्ये आहे. २८ मेच्या सुमारास हा आकडा हजारपर्यंत खाली आला होता. तोच १६ ऑक्‍टोबरला १५ हजार ६३५ पर्यंत गेला. रशियात मेमध्ये रुग्णांचा आकडा १० हजारांवर गेला. 
२७ ऑगस्ट दरम्यान तो पाच हजारपंर्यंत आला, मात्र १६ ऑक्‍टोबरला तेथे १५ हजार १५० पर्यंत रुग्णांचा आकडा गेला आहे. 


इटलीमध्ये मार्च, एप्रिलमध्ये सहा हजारांपर्यंत पोचलेला आकडा २५ जूनच्या आसपास शंभरापर्यंत खाली आला होता, मात्र १६ ऑक्‍टोबरला हाच आलेख १० हजारांपर्यंत गेला आहे.
सतर्क राहणे गरजेचे देश-विदेशातील आकडेवारी पाहता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याचे दिसते. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही केले आहे. कोल्हापुरात पुन्हा लाट येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

रुग्णसंख्या कमी झाल्यावर सुमारे शंभर दिवसांनंतर कोरोनाची आणखी एक लाट येत असल्याचे देश-विदेशातील अभ्यासातून दिसते, हे खरे आहे. सध्या रुग्ण कमी होत असले तरीही पुन्हा ही लाट कोल्हापुरात येऊ शकते, यासाठी तयारी असली पाहिजे.
- डॉ. योगेश साळी, जिल्हा आरोग्याधिकारी

देश-विदेशातील विचार करता दोन महिन्यांनंतर कोरोनाची साथ भारतात आली. हीच साथ देशात डिसेंबरमध्ये पुन्हा येऊ शकते, त्याची तीव्रता पूर्वीपेक्षा दुप्पट असण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र, दिल्लीत संख्या कमी आली असली तरी कर्नाटक, तेलंगणा, ओडिशात ती वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, याचा हवामानाशी कोणताही संबंध नाही.
- डॉ. विजय हिराणी

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com