तारीख पे तारीख तारीख पे तारीख

राजेश मोरे
Monday, 10 August 2020

ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे व भरत कुरणे यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 17 ऑगस्टला होणार आहे.

कोल्हापूर ः ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे व भरत कुरणे यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 17 ऑगस्टला होणार आहे.

पानसरे हत्या प्रकरणी तपास यंत्रणेने संशयित समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडेसह 12 जणांवर गुन्हे दाखल केले. यातील संशयित सारंग आकोळकर, विनय पवार या दोघांचा अद्याप शोध सुरू आहे. दरम्यान कारवाई केलेल्या संशयित सचिन अंदुरे व भरत कुरणे यांनी जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. आज त्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यात संशयिताचे वकील समीर पटवर्धन यांनी बाजू मांडली. न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी 17 ऑगस्टला ठेवली आहे. या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर हे बाजू मांडतील अशी शक्‍यता आहे. सुनावणीवेळी तपासी अधिकारी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे उपस्थित होते.

 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Date by date Date by date