esakal | ठाण्याहून आलेला मृतदेह कर्नाटक सिमेवर रोखला अन् घेतला 'हा' निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

dead body from Thane was stopped at the Karnataka border

बैलहोंगलचा मृत  : अधिकारी, नातेवाईकांची उपस्थिती

ठाण्याहून आलेला मृतदेह कर्नाटक सिमेवर रोखला अन् घेतला 'हा' निर्णय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोगनोळी (बेळगाव) - ठाण्यामध्ये अपघाती निधन झालेल्या बैलहोंगल येथील नागरिकाच्या मृतदेहावर कोगनोळी येथील गायरानात अधिकारी व नातेवाईकांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २८) अंत्यसंस्कार करण्यात आले.लिंगराज बसवप्रभू बेळगावी (वय ५३, रा. बैलहोंगल) असे अपघाती निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. येथील सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात न सोडण्याच्या कारणावरुन आजवर तिसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, लिंगराज हे ठाण्यामध्ये नोकरी करत होते. अपघाती निधनानंतर ठाण्यातून  कोगनोळी येथील सीमा तपासणी नाक्यावर नातेवाईक मृतदेहासह आले. मात्र कर्नाटकात प्रवेश दिला जात नसल्याने या ठिकाणीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील गायरानामध्ये मुलग्याने साश्रुनयनांनी अग्नी दिला. यावेळी नातेवाईक व मित्रमंडळींनी आक्रोश केला.

वाचा - दिलासादायक : बेळगाव शहरात नवा कंटेन्मेंट झोन नाही...

यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायतीचे अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे उपस्थित होते.
लिंगराज यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

अधिकाऱ्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

लिंगराज यांच्या मुलग्याने अग्नी देऊन आक्रोश केला. तो पाहून येथे उपस्थित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले.तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी त्याचे सांत्वन केले.

go to top