esakal | कोल्हापुरात 'एवरीबडी से खच्याक' मामाला भावपूर्ण श्रद्धांजली

बोलून बातमी शोधा

dead of one person in kolhapur craze on social media during corona}

बावड्यातील प्रत्यके गल्लीत गाण्याचा आवाज ऐकू आला की समजायचं की खाच्याक मामा आले.

कोल्हापुरात 'एवरीबडी से खच्याक' मामाला भावपूर्ण श्रद्धांजली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अत्यंत उत्तम न चुकता इंग्रजी बोलणाऱ्या. एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तिलाही लाजवेल अस तोंडपाठ इंग्रजी आणि गणिताची सुत्र. शब्दांच्या जातींसह अभ्यासाचं जबरदस्त परफेक्शन असणाऱ्या खाच्याक मामाने काल इहलोकाचा निरोप घेतला. कसबा बावडा परिसरातील संकपाळ परिसरातील बाबुराव मारुती पाटोळे यांचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

शहरतील कसबा बावडा परिसरातील अनेक लोकांचे लाडक्या खाच्याक मामाची काल जीवनयात्रा संपली. बावड्यातील प्रत्यके गल्लीत गाण्याचा आवाज ऐकू आला की, समजायचं खाच्याक मामा आले. में हुं डॉन, याराना अशी सुप्रसिद्ध गाणी अगदी कोणताही शब्द न चुकता म्हणणारा खाच्याक मामा मात्र आता परत दिसणार नाही. 

कोरोनाच्या काळात इंग्रजीमधून त्यांनी काळजी घ्या असे आवाहन केले होते. काल सांयकाळपासुनच सोशल मीडियावर त्यांचा फोटो आणि त्यांनी म्हंटलेल्या गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले. या  माध्यमातून लोकांनी खाच्याक मामाला श्रद्धांजली वाहिली आहे.