कोल्हापुरातील अश्‍विनीच्या  "हर्बल ग्रीन टी'ला पोतुर्गाल, युगांडात मागणी 

संदीप खांडेकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोल्हापूरच्या अश्‍विनी अधिकराव जाधव हिने. तिच्या "हर्बल ग्रीन टी'ला पोतुर्गाल व युगांडातून मागणी आली आहे. विशेष म्हणजे अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या स्टार्टअप अंतर्गत तिला 12 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. 

कोल्हापूर  : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच उद्योजक होण्याची संधी मिळाली तर?, त्यातही प्रॉडक्‍टला परदेशातून मागणी आली तर? ही किमया घडवली आहे, कोल्हापूरच्या अश्‍विनी अधिकराव जाधव हिने. तिच्या "हर्बल ग्रीन टी'ला पोतुर्गाल व युगांडातून मागणी आली आहे. विशेष म्हणजे अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या स्टार्टअप अंतर्गत तिला 12 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. 

परिषदेने स्टार्ट अपसाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट रिसर्च फॉर कॉटन टेक्‍नॉलॉजीला नोडल संस्था म्हणून नियुक्त केले होते. 
या टेक्‍नॉलॉजीतर्फे विद्यार्थी, उद्योजकांकडून स्टार्ट-अपसाठी "नावीन्यपूर्ण संकल्पान, संशोधन प्रकल्पांतर्गत देशभरातून अर्ज मागवले होते. तिच्या हर्बल ग्रीन टी या इनोव्हेटिव्ह प्रॉडक्‍टची माहिती अर्जात दिली होती. तिच्या प्रॉडक्‍टचे सिलेक्‍शन झाले. त्याचे सादरीकरण मुंबईत झाले. प्राथमिक टप्प्यातील प्रॉडक्‍टची माहिती घेतल्यानंतर पुन्हा तिला मेलवरून मुंबईला येण्याचा निरोप पाठविला. सेंट्रल इन्स्टिट्यूट रिसर्च फॉर कॉटन टेक्‍नॉलॉजीचे संचालक पी. जी. पाटील यांच्यासह तज्ज्ञांसमोर तिने पुन्हा सादरीकरण केले. मुंबईत चार वेळा सादरीकरण झाल्यानंतर दिल्लीच्या कार्यशाळेतही प्रॉडक्‍टचे सादरीकरण झाले. हैदराबादला अंतिम सादरीकरण मार्चमध्ये होणार होते. कोरोनामुळे ते प्रलंबित राहिले होते. अखेर विलंब होत असल्याने मुंबईला जून, तर हैदराबादला जुलैमध्ये अंतिम सादरीकरण झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचा त्यात समावेश होता. प्रॉडक्‍टला मार्केट कसे उपलब्ध होईल?, त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल, याची तिने माहिती दिली. परिषदेने तिच्या प्रॉडक्‍टचे शंभर बॉक्‍स मागवून घेतले. विशेष म्हणजे स्टार्ट-अपसाठी तिची निवडही झाली. तिच्या प्रॉडक्‍टसला परिषदेकडून ब्रॅंडिग, तर महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाकडून मान्यता मिळाली. 

अश्‍विनीने सायबरमधून बी. टेक. फूड टेक्‍नॉलॉजी, तर शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून एम. एस्सी. फूड टेक्‍नॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आविष्कार संशोधन स्पर्धेत तिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकही मिळवला आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर तिने म्हैसूरमधील केंद्रीय अन्न व प्रक्रिया संशोधन संस्थेतील स्पाईस अँड फ्लेवर डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. बी. बी. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. त्यानंतर "हर्बल ग्रीन टी'चा फॉर्म्युला तयार केला. तिला फूड टेक्‍नॉलॉजीचे प्रमुख डॉ. ए. के. साहू यांचे मार्गदर्शन मिळाले. 

"हर्बल ग्रीन टी'ची वैशिष्ट्ये 
- रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतो 
- रक्तदाब कमी करतो 
- रोगप्रतिकारकशक्ती उपयुक्त 
- रक्तातील चरबी कमी करतो 
- खनिजे, जीवनसत्वे, कॅल्शियमचेही प्रमाण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for "Herbal Green Tea" from Ashwini in Kolhapur, Portugal, Uganda

टॉपिकस