तर मंगल कार्यालयांवर होणार फौजदारी ; 'गर्दीचे कार्यक्रम आयोजित कराल तर याद राखा'  

Deputy Commissioner Nikhil More said that Mangalkaryalayas should abide by various orders issued by the government to prevent Kovid 19
Deputy Commissioner Nikhil More said that Mangalkaryalayas should abide by various orders issued by the government to prevent Kovid 19

कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक व मंगलकार्यालयांनी कोव्हीड-19 रोखण्यासाठी शासनाने काढलेल्या विविध आदेशाचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर तरतूदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल. असा इशारा उपायुक्त निखिल मोरे यांनी दिला आहे.

मंगल कार्यालये, लॉन, वातानुकुलित मंगल कार्यालये, सभागृहे हॉल येथे 50 लोकांच्या मर्यादेतच विविध कार्यक्रम अथवा लग्न समारंभ करायचे आहे. गर्दीचे कार्यक्रम आयोजित कराल तर फौजदारी केली जाईल,अस इशाराही देण्यात आला आहे. 

महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक व मंगलकार्यालयांनी खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह/हॉटेल,घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमीत केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास कोल्हापूर महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात येत आहे.

शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन गर्दीचे कार्यक्रम आयोजित होत असल्याचे महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आले आहे. तरी खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह/हॉटेल यांनी महानगरपालिकेने दिलेल्या परवानगीमधील अटीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा भारतीय दंड संहीता 1860(45) यांच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही श्री मोरे यांनी स्पष्ट केले आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com