आता कमी खर्चात होणार सेरोटोनिन चाचणी ; डॉ. सागर डेळेकर यांचे संशोधन; चार पेटंट दाखल

Developed a low cost serotonin test research by dr sagar delekar research medical marathi news
Developed a low cost serotonin test research by dr sagar delekar research medical marathi news

कोल्हापूर : सध्याच्या दगदगीच्या जीवनात मानसिक आरोग्य ढासळणार व्यक्तींची संख्या वाढत आहे. मानवी शरीरातील सेरोटोनिन या मूलद्रव्याच्या प्रमाणावर मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. प्राथमिक अवस्थेत याचे योग्य निदान झाल्यास ही परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. या निदानासाठी महागड्या तपासण्या कराव्या लागतात. याला पर्याय शोधत कोल्हापूरचे डॉ. सागर डेळेकर यांनी सुलभ व कमी खर्चिक सेरोटोनिन चाचणी पद्धत विकसित केली आहे.त्यांनी हे संशोधन अमेरिका ब्रिटनमधील संशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने केले. मानवी शरीरातील आनंददायी मूलद्रव्य इलेक्‍ट्रोकेमिकल चाचणी पद्धत तसेच अंतीबॅक्‍टरियल रंगनिर्मितीसाठी विविध नॅनो संमिश्र यांची निर्मिती प्रयोगशाळेत केली आहे.

डॉ. डेळेकर करवीर तालुक्‍यातील कुरुकलीचे. वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई गृहिणी. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. सागर विज्ञान क्षेत्रात अपघाताने आले. कला शाखेचे वर्ग फुल झाल्याने त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास शिक्षकांनी सांगितले. अकरावीत त्यांना विज्ञान शाखेची गोडी लागली. भोगावती कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. पुढे शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात एम एस्सी पुर्ण करून सॉलिड मटेरियल्स या विषयात पीएचडी संपादन केली. २००१ साली ते नेट परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यांची निवड शिवाजी विद्यापीठात अस्थायी प्राध्यापक म्हणून केले. औरंगाबादमध्ये ही त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली. तेथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नामांकित संस्थेकडून त्यांना समर रिसर्च फेलोशिप मिळाली. पुन्हा ते शिवाजी विद्यापीठात ते सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 

चार पेटंट दाखल
दरम्यान, त्यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून रिसर्च प्रोजेक्‍ट मिळाला. तसेच यूजीसी कडून पोस्ट डॉक्‍टरल रिसर्चसाठी रमण फेलोशिप जाहीर झाली. या फेलोशिप अंतर्गत अमेरिकेत फ्लोरिडा स्टेट यूनिवर्सिटी मध्ये त्यांनी नोबेल प्राईज विजेते हॅरी क्रोटो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बहुआयामी नॅनो समिश्रे या विषयावर संशोधन केले. या संशोधनाबद्दलची चार पेटंट त्यांनी दाखल केली आहेत.

 संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com