देववाडीतील निर्भयासाठी गावकऱ्यांचा  कॅंडल मार्च ; नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

आमच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा विशेषत: महिलावर्ग देत होता. संपूर्ण गावातून हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

मांगले (सांगली) : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील देववाडी येथील   महिलेवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या  नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी  गावकऱ्यांनी कॅडल मार्च काढला. गावातीलच धनाजी खोत या २२ वर्षीय  तरुणाने या महिलेचा बलात्कार करून तिला विहिरीत फेकून दिल्याची घटना  समोर आली होती. या घटनेपासून आरोपी विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

यावेळी महिलांसह हजारो ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. पीडित महिलेचे नातेवाईकही मोर्चात सहभागी झाले होते. कॅंडल मार्चनंतर ग्रामपंचायत चौकात जमाव जमा झाला. या वेळी सोमवारी (ता. २५) मोठ्या संख्येने शिराळा येथे निवेदन देण्याकरिता जाण्यासाठी एकत्रित येण्याचे आव्हान करण्यात आले. 

हेही वाचा- सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची न्यूज

आमच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा विशेषत: महिलावर्ग देत होता. संपूर्ण गावातून हा निषेध मोर्चा काढण्यात आला. शिराळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.सोमवारी शिराळा तहसील कार्यालयावर एकत्रित जाऊन निवेदन देण्याच्या मुद्द्यावर ग्रामस्थांचे एकमत झाले. दरम्यान, या घटनेत अटक करण्यात आलेला संशयित आरोपी धनाजी खोत याला शिराळा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर उभे केले असता त्याला गुरुवार (ता. २८)पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devwadi Villagers candlelight march for Nirbhaya sangli latest news marathi news