शेतात पाणी तुंबल्याने मळण्या होताहेत टेकड्यांवर

Difficulties In Farming Due To Flooding In The Field Kolhapur Marathi News
Difficulties In Farming Due To Flooding In The Field Kolhapur Marathi News
Updated on

कोवाड : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतर शेताना तलावाचे स्वरूप आले. सततच्या पावसामुळे उभ्या पिकांतून पाण्याचे पाट वाहू लागले. हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना शेतात पाणी असतानाही भाताचे पिक कापून बाहेर काढावे लागले. कापलेल्या भाताच्या मळणीचा प्रश्‍न समोर आला. ओलसर असलेल्या भाताची मळणी शेतात करणे अवघड असल्याने शेतकऱ्यांनी गावच्या टेकडीवरील खळी करून मळणीच्या कामाला गती दिली. यामुळे यावर्षी शेतातील खळी गायब होऊन गावची टेकडं शेतकऱ्यांना मळणीसाठी आधार ठरली आहेत. पण खर्चात वाढ झाली आहे. 

ढगफुटीसदृश्‍य पडणाऱ्या पावसाचा भात पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी ती एकूण खर्चाच्या मानाने मिळणारी मदत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसापासून पाऊस थांबला असला तरी शेतातून अजून पाणी आहे. साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम शेतकरी करीत आहेत.

जमिनीत ओलसरपणा असला तरी भाताच्या कापणीचे दिवस संपल्याने भाताची झडणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी शेतात साचलेल्या पाण्यातून भाताची कापणी करुन भात बाहेर काढत आहेत. कापणी झालेले भात सुकविण्याची अडचणी असल्याने शेतकरी ओल्या भाताचीच मळणी करत आहेत. मळणीसाठी शेतकऱ्यांनी पर्यायी टेकडीवरील माळरानावर जागेची निवड केली आहे. मळणीनंतर त्याच ठिकाणी भात व गवत सुकविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे गावच्या टेकड्या गवत व मळलेल्या भातानी व्यापली आहेत. 

सुगी तोट्याची 
शेतात पाणी असल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना भात कापणीनंतर शेतात मळणी करता आली नाही. त्यामुळे भात कापणी, भाताची ट्रॅक्‍टर ट्रॅलीमधून वाहतूक, मळणी व वाढीव मजूरीचा भार शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याने यावर्षी भाताची सुगी तोट्याची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com