साखर कारखान्यांच्या स्पेेअरपार्टस् अभावी खोळंबतोय मेन्टेनन्स, गाळप हंगामाचे आव्हान

Difficulties In Maintenance Due To Lack Of Spare Parts Of Sugar Factories Kolhapur Marathi News
Difficulties In Maintenance Due To Lack Of Spare Parts Of Sugar Factories Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : आगामी गाळप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांश साखर कारखान्यांमध्ये मशिनरींची ओव्हर ऑईलिंगची कामे सुरू झाली आहेत. ऑक्‍टोबरअखेर कारखाने सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन धडपडत असतानाच कोरोनामुळे नवे आव्हान कारखान्यांसमोर उभे ठाकले आहे. देखभाल दुरुस्तीसाठी आवश्‍यक असणारे पार्टस्‌ (साहित्य) पुणे, मुंबईतच अडकल्याने मेन्टेनन्सची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे अडचण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. 

ऑक्‍टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान बहुतांशी साखर कारखाने सुरू होतात. त्या दृष्टीने आधी चार-पाच महिन्यांपासून कारखान्यातील मशिनरींचे ओव्हर ऑईलिंग आणि इतर कामे गतीने सुरू झालेली असतात. ही मेन्टेनन्सची कामे करताना काही नव्या पार्टस्‌चीही गरज भासत असते. हे पार्टस्‌ पुणे, मुंबई येथून मागविले जातात. यंदाही कारखान्यांकडून संबंधित पुरवठादारांना मागणी कळविली आहे; परंतु या दोन्ही शहरांत कोरोनाचा हाहाकार सुरू आहे.

रुग्णांची संख्या इतकी आहे की, बहुतांशी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यातच सध्या कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाउन असल्याने बाहेरून लोकांसह वाहनांनाही जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मागणी कळवूनही अद्याप पुणे, मुंबईहून कारखान्यांना साहित्याचा पुरवठा झालेला नाही.

ओव्हर ऑईलिंगची कामे सुरू असतानाच पार्टस्‌ बदलण्याचीही गरज असते. त्यामुळे गरजू साहित्यच नसल्याने कामे खोळंबत आहेत. मशिनरींची कामे एकमेकावर अवलंबून असल्याने मोठी अडचण झाली आहे. कारखाना व्यवस्थापन वारंवार संबंधित पुरवठादारांना फोन करून साहित्यासाठी तगादा लावत आहेत; परंतु लॉकडाउन आणि कन्टेन्मेंट झोनमुळे साहित्याची वाहतूक करणेही अवघड झाले आहे. परिणामी काहीच करता येत नसल्याने व्यवस्थापन हतबल झाल्याचे चित्र आहे.

ऑक्‍टोबरच्या पूर्वी कारखान्यांची कामे पूर्ण करावी लागणार असल्याने व्यवस्थापनामध्ये मोठी चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे वेळेत ही कामे पूर्ण करणे व्यवस्थापनाला आव्हान ठरणार आहे. दरम्यान, गळीत हंगामाच्या अनुषंगाने करावयाच्या ऊस वाहतुकीच्या वाहनांचे करार पूर्ण झाले आहेत. सर्व वाहतूकदारांना ऍडव्हान्सची रक्कमही अदा केली आहे; परंतु गळीतासाठी जे काम अत्यावश्‍यक आहे त्या मेंटेनन्स कामातच अडथळा येत असल्याने व्यवस्थापनाला साहित्य मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 

कामात अडचणी
कारखान्यामध्ये मशिनरींच्या ओव्हर ऑईलिंगची कामे सुरू आहेत. त्यासाठी लागणाऱ्या विविध पार्टस्‌च्या ऑर्डर्स संबंधित पुरवठादारांकडे दिल्या आहेत; परंतु काही पुरवठादारांचे कारखाने, शोरूम्स प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने साहित्य पाठवण्याला अडचणी येत आहेत. परिणामी मेंटेनन्स कामात अडचणी येत आहेत. 
- व्ही. एच. गुजर, जनरल मॅनेजर, ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनी, शुगर डिव्हीजन.

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com