ब्रेकिंग - "व्हिजन ऍग्रो'चा संचालक सुशील पाटील जेरबंद ; घराच्या पोटमाळ्यावर बसला होता लपून 

Director of Vision Agro Sushil Patil arrested in kolhapur
Director of Vision Agro Sushil Patil arrested in kolhapur

कोल्हापूर - मल्टिलेव्हल मार्केटिंग ड्रीम प्लॅनची स्वप्ने दाखवून 84 लाखांहून अधिकच्या फसवणूक प्रकरणी व्हिजन ग्रीन ऍग्रो प्रॉडक्‍टस व व्ही ऍण्ड के. ऍग्रोटेक प्रॉडटक्‍स प्रा. लि. कंपनीचा संचालक संशयित सुशील पाटील याला आर्थिक गुन्हे शाखेने आज जेरबंद केले. घराच्या पोटमाळ्यावर तो लपून बसला होता. त्याच्याकडून लॅपटॉप व महत्वाची कागदपत्रे शाखेच्या हाती लागली आहेत. दरम्यान याप्रकरणातील मुख्य प्रवर्तक विकास खुडेच्या घराचीही झडती घेण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्हिजन ग्रीन ऍग्रो प्रॉडक्‍टस आणि व्ही.ऍण्ड. के. ऍग्रोटेक प्रॉडक्‍टस्‌ कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संशयित विकास खुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या खुडे (दोघे रा. पोर्ले, ता. पन्हाळा) या दोघांसह संशयित प्रसाद पाटील (रा. शिवाजी पेठ), सुशील शिवाजी पाटील (रा. यवलूज, पन्हाळा), तुकाराम पाटील (रा. माजगाव, पन्हाळा) या पाच जणांवर शाहूपुरी पोलिसात 84 लाख 56 हजार 200 रुपयाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्यातील फसवणुकीची व्याप्ती वाढू लागल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. यापूर्वीच पाचही संशयित व्हिनस कॉर्नर येथील कार्यालय बंद करून पसार झाले. त्या सर्वांचा शोध पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर व त्यांच्या पथकाने सुरू केला. 

दरम्यान, यवलूज (ता. पन्हाळा) येथील संशयित सुशील पाटीलच्या घरावर पथकाने छापा टाकला. त्यावेळी तो पोटमाळ्यावर लपून बसला होता. त्याला पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यासंबधिची महत्वाची कागदपत्रे व लॅपटॉपही जप्त केला. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसाची कोठडी सुनावली. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक इंदलकर, पोलिस हवालदार दिनेश उंडाळे, अविनाश गावडे यांनी केली. 

विकास खुडेच्या घराची झडती... 
या प्रकरणातील मुख्य संशयित विकास खुडेच्या पोर्ले (ता. पन्हाळा) येथील घराची पथकाने झडती घेतली. त्यात पोलिसांना महत्वाची कादपत्रे, घड्याळ, मोटारसायकल मिळून आली. ती पोलिसांनी जप्त केली. तसेच इतर संशयितांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू असल्याचे इंदलकर यांनी सांगितले. 

हे पण वाचा - 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com