शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत मे महिना अखेरपर्यंत कळवू : खा.संभाजीराजे

Discussions were held with Chief Minister Uddhav Thackeray regarding the Shiv Rajyabhishek ceremony
Discussions were held with Chief Minister Uddhav Thackeray regarding the Shiv Rajyabhishek ceremony

कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर सहा जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून, मे महिना अखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊन तो सर्वांना कळवण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, शिवराज्याभिषेक विधिवत पार पाडणार असून, त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल, याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या अन देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोचतात. राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येतात.गेली चौदा वर्षे हा सोहळा अगदी राजवैभवात संपन्न होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी पाच देशांचे राजदूत त्या त्या देशाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून राजसदरेवर महाराजांना मुजरा करण्यासाठी दाखल झाले होते.

यावर्षी सुद्धा सोहळा दिमाखात व आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्याचे नियोजन होते. परंतु जगाला महामारीरूपी शत्रूने वेढले आहे. देशात, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कोरोनामुळे दरवर्षी प्रमाणे शिवभक्तांना इच्छा असूनही लाखोंच्या संख्येने गडावर येता येणार नाही. संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे. कोरोनाचा संसर्ग अजून किती प्रमाणात वाढेल? लाॅकडाऊनचा कालावधी अजून किती दिवस असेल? किती शिवभक्तांना गडावर जाण्याची परवानगी मिळेल? त्याबाबत स्पष्टता  नाही. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकारांशी चर्चा सुरू आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com