आजऱ्यात 300 हेक्‍टरवर करपा, कडा करपा रोग... "हे' पिक आले धोक्‍यात

Diseases On 300 Hectares Of Paddy In Ajara Kolhapur Marathi News
Diseases On 300 Hectares Of Paddy In Ajara Kolhapur Marathi News

आजरा : आजरा तालुक्‍यात भातावर करपा व कडा करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. सुमारे 300 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे रोग पडल्याचे सांगितले जात असून त्याला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी औषधाची फवारणी करावी, अशा सूचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या आहेत. 

आठ दिवसांपूर्वी तालुक्‍यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. सलग चार दिवस तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. सध्या पावसाची उघडीप असून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हे वातावरण रोग व किडीला पोषक आहे. त्यामुळे भात व ऊस पिकावर रोगांचे प्रमाण वाढले आहे.

भाताच्या पानावर छोटे-छोटे ठिपके दिसत असून काही ठिकाणी पाने पिवसळ होऊन कडा वाळल्याचे दिसते. त्यामुळे या पिकावर करपा व कडा करपा हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्‍यातील सर्वच गावात याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्याचे ढगाळ व कुंद वातावरण पहाता हा रोग अधिक प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या रोगाला वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना औषध फवारणीच्या सूचना केल्या आहेत.

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नत्र खताचा अतिरिक्त वापर केल्यामुळे भात पिकावर या रोगाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्‍यक त्या प्रमाणे नत्र खतांचा वापर करावा, अशीही सूचना कृषी विभागाने केली आहे. पुराचा फटका नदीकाठच्या पिकाना बसला आहे. त्यातच रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त होत आहे. माळरान, नदीकाठ, पाणथळ परिसरात सर्वत्र या रोगाचा प्रार्दुभाव झाल्याचे सांगण्यात येते. 

दृष्टिक्षेप 
- भाताचे क्षेत्र 9 हजार 700 हेक्‍टर 
- ढगाळ व कुंद वातावरणाचा परिणाम 
- उत्पादनात घट होण्याची भीती. 

वेळीच फवारणी करावी
वातावरणीय बदलामुळे भात व ऊस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. भातावर करपा व कडा करपा, तर उसावर तांबेरा पडला आहे. शेतकऱ्यांनी औषधाची वेळीच फवारणी करावी. रोगावर नियंत्रण करणे शक्‍य होईल. 
- सुधीर खोराटे, कृषी अधिकारी, आजरा 
विजयसिंह दळवी, कृषी पर्यवेक्षक, आजरा 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com