हृदय हेलवणारी घटना; अंत्यसंस्कारानंतरही मृतदेहाची हेळसांड! स्थिती पाहून संतापाची लाट 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

हृदय हेलवणारी अशी घटना घडल्याने नागरिकांच्या मनात प्रशासनाच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

इस्लामपूर : प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे येथील कापुसखेड नाका परिसरातील स्मशानभूमीत अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे लचके कुत्रे तोडत आसल्याचे आज नागरिकांच्या निदर्शनास आले. हृदय हेलवणारी अशी घटना घडल्याने नागरिकांच्या मनात प्रशासनाच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

शिराळा तालुक्यात व्हेंटिलेटरची सुविधा कोठेही उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणच्या कोरोना रुग्णास इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या प्रशासनाने 34 हजार रुपये भरून घेतले. त्यानंतर रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इस्लामपूर नगरपालिका हद्दीतील कापुसखेड नाका येथील स्मशान भूमीत नेण्यात आला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करत असताना उपस्थित नागरिकांना त्याठिकाणी हृदय हेलवणारी घटना दिसून आली. कोरोनानेच दगावलेल्या रूग्णाच्या मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांना अर्धवट जळलेला मानवी मृतदेह कुत्र्याने ओढत बाजूला नेऊन त्याचे लचके तोढत असताना दिसून आले. ही घटना पाहताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. 

हे पण वाचा - असा झाला भ्रष्टाचाराचा भांडा फोड ; शासनाचीच केली तब्बल 16 लाखांची फसवणूक

फक्त कोव्हीड सेंटरची उद्घाटन होत आहेत. परंतु रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. या कारणास्तव प्रचंड पैशाची मागणी केली जात आहेत. एवढे करूनही रुग्ण दगावतो. त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतरही त्याच्या शरीराचे लचके कुत्रे ओढत आहेत. अशी अवस्था सामान्य नागरिकांची झालेली आहे. याला जबाबदर कोण ? स्थानिक प्रशासन, नगराध्यक्ष, जिल्ह्याचे पालक मंत्री असा प्रश्न स्मशानभूमीतच उपस्थित नागरिक करीत आहेत.

हे पण वाचा - त्यामुळे त्याने स्वत:च्या पत्नीचे संपविले आयुष्य

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disgrace to corona patient dead body in sangli