
कोल्हापूर : मराठा आरक्षणाला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मराठा असल्याचे दाखल देणे आजपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी आणि नोकरीच्या अपेक्षेत असणारे बेरोजगारांचा अपेक्षाभंग झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात दररोज सुमारे 200 ते 300 दिले जाणारे मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप थांबवले जाणार आहे. न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत दाखले वाटप थांबणार आहेत.
मराठा आरक्षणला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. यातून न्यायालयाच्या निर्णयाआधी ज्यांनी नोकरी, शैक्षणिक प्रवेश मिळवला आहे. तो प्रवेश अंतिम निर्णय येईपर्यंत कायम राहणार आहे. मात्र, हा दाखला दाखवून नवीन शैक्षणिक प्रवेश किंवा नोकरीत सहभाग घेण्यास अडचण येणार आहे. गुणवत्ता असूनही मराठा समाज शैक्षणिक आणि नोकरी मागे राहत आहे. त्यामुळे या समाजाची प्रगती खुंटली आहे. शेती नाही, नोकरी नाही त्यामुळे अपेक्षित शिक्षण घेता येत नाही. यासाठी या दाखल्याचा मोठा आधार होता. उच्च न्यायालयाच्या समितीने मराठा समजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेले आरक्षण तात्पुरते स्थिगित केले आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुण बेरोजगार व विद्यार्थां आर्थिक उन्नतीपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
कोरोना लॉकडाऊनमूळे दाखले वाटपाचे काम कमी झाले होते. लॉकडाऊन कमी केल्यानंतर पुन्हा याला गती आली होती.
मराठा जात प्रमाणापत्र मिळवण्यासाठी
जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रात ऑनलाईन अर्ज करावा लागतो
- हिंदू मराठा उल्लेख असलेला शाळेचा दाखला
- शाळा सोडलेला दाखला (जन्मतारीख व जातीचा उल्लेख हवा)
- घरातील कोणत्याही वारसाचा 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी जन्म झाल्याचा दाखला
- समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने ठरवलेले प्रमाणपत्र
- बहिण किंवा भावाचा शाळा सोडल्याचा दाखला
- जन्म-मृत्यूची नोंद असलेला महसूल अभिलेखातील पुरावा
- शासकीय नोकरीचा जातीची नोंद असलेला दाखला
- वंशावळ
-महसूल पत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- आधाकार्ड
-रेशनकार्ड
- छायाचित्र
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.