esakal | कोल्हापूरातील या 4 मार्गाना मिळाला जिल्हाचा दर्जा...
sakal

बोलून बातमी शोधा

The districts status was achieved through these 4 routes kolhapur marathi news

जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्याच्या लांबीत वाढ. जि. प.च्या प्रस्तावानुसार ‘बांधकाम’कडून बदल..

कोल्हापूरातील या 4 मार्गाना मिळाला जिल्हाचा दर्जा...

sakal_logo
By
संजय खूळ

इचलकरंजी  (कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्याच्या लांबीत तब्बल ५१.७  किलोमीटरने वाढ झाली आहे. आता जिल्ह्यातील एकूण जिल्हा मार्गाचे अंतर १९३३ किलोमीटर झाले आहे. इतर जिल्हा मार्गात तब्बल ४० किलोमीटर घट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रस्तावानुसार काही रस्त्यांच्या दर्जाबाबत बदल केला आहे. या बदलामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची ही स्थिती झाली आहे.

दरम्यान अनेक वर्षे प्रलंबित असलेला हातकणंगले ते रुई इंगळी हा रस्ता आता प्रमुख जिल्हा मार्ग बनला आहे. तांत्रिक कारणामुळे रखडलेला रुई फाटा ते रुई हा रस्ता रुंदीकरण सह डांबरीकरण होण्यास खुला झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्‍यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्ग करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेने याबाबत मागणी केली होती.

हेही वाचा- नाणार वाद पेटला ; भाजपच्या नेत्याचा गौप्यस्फोट....

रस्त्याच्या लांबीत तब्बल ५१.७  किलोमीटरने वाढ

या रस्त्यावर असणारी मोठ्या प्रमाणात वाहतूक, गावची लोकसंख्या, रस्त्याचा होणारा वापर आणि जिल्हा परिषदेचा ठराव या सर्व बाबी विचारात घेऊन शासनाने हातकणंगले तालुक्‍यातील ४ रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मार्ग यापूर्वी प्रमुख जिल्हा मार्ग नसल्यामुळे त्या ठिकाणची कामे शासनाच्या विविध योजनेतून घेणे शक्‍य नव्हते. आता या मार्गावर नव्याने रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण शक्‍य झाले आहे.दरम्यान, यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण प्रमुख जिल्हा रस्त्याची लांबी १८८१ किमीइतकी होती. ती आता १९३३ किमीइतकी झाली आहे. इतर जिल्हा मार्ग रस्त्याच्या लांबीत ४० किमीने घट होऊन ती आता १६७७ किमी झाली आहे.

हेही वाचा- सावधान ! रत्नागिरीत 902 वाड्यांना बसणार झऴ...

नव्याने झालेले प्रमुख जिल्हा मार्ग
शासनाने जाहीर केल्यानंतर हातकणंगले तालुक्‍यातील जिल्हा मार्ग, अंतर व दर्जा वाढल्यानंतर त्याला मिळालेला जिल्हा क्रमांक असे 
  वडगाव लाटवडे भेंडवडे खोची ते दुधगाव आष्टा जिल्हा हद्द रस्ता अंतर १३.३ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०९
  हुपरी ते इंगळी ते चंदूर इचलकरंजी ( ११.४ किलोमीटर) प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ११०
  इचलकरंजी रुई चंदूर ते हुपरी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १११
  हातकणंगले ते रुई इंगळी तळंदगे रस्ता १४ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ११२

go to top