टोपमधील डॉक्‍टर पॉझिटिव्ह; अनेकांना भरली धडकी 

युवराज पाटील, शिरोली पुलाची
बुधवार, 15 जुलै 2020

टोपमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या संपर्कात आलेल्या 55 वर्षीय डॉक्‍टराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अनेकांना धडकी भरली आहे.

टोप : टोपमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या संपर्कात आलेल्या 55 वर्षीय डॉक्‍टराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अनेकांना धडकी भरली आहे. याचबरोबर त्यांच्या संपर्कातील आणखी 10 जणांचे अहवला निगेटिव्ह आले आहेत. यामुळे गावाला थोडा दिलासा मिळाला असला तरी चिंता कायम आहे. 

येथील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकास कोरोनाची बाधा झाल्याचे दहा जुलैला स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले टोप येथील डॉक्‍टरसह 9 लोकांना क्वारंटाईन केले होते. त्यातील रुग्णाची पत्नी व मुलगा यांचा अहवाल निगेटिव्ह आला असताना सोमवार (ता. 13) रात्री उशिरा आलेल्या अहवालात रुग्णाची तपासणी करणाऱ्या 55 वर्षीय डॉक्‍टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली. 

बाधित डॉक्‍टर ज्येष्ठ असून, त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या लोकांचा संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. डॉक्‍टरांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची क्रमवारी ठरवण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. आतापर्यत डॉक्‍टरनी 20 ते 22 जणांची तपासणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, डॉक्‍टरांकडे 5 ते 10 जुलै या कालावधीत उपचार घेणाऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच रूपाली तावडे यांनी केले. 

दृष्टिक्षेप 
- ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या सपंर्कातील डॉक्‍टर पॉझिटिव्ह 
- 10 जणांचा अहवाल निगेटिव्ह 
- सर्व 10 जणांना क्वारंटाईन 
- डॉक्‍टरकडून 20-22 जणांची तपासणी 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor positive in the hat; Shocked to many