खास कुत्र्यांची वाहतूक करण्यासाठी अशी असते ‘डॉग कॅरिअर व्हॅन’...

शिवाजी यादव
सोमवार, 23 मार्च 2020

दहा-बारा वर्षांपासून ‘कॅनन क्‍लब’सारख्या संस्था राज्य, राष्ट्रीयस्तरावर श्‍वान प्रदर्शन भरविले जाते. यात देशी-विदेशी श्‍वान संगोपन करणारे श्‍वानप्रेमी आपले श्‍वान सहभागी करतात.

कोल्हापूर - जिवापाड प्रेम करून संगोपन केलेले श्‍वान, त्याची तंदुरुस्ती, भक्कम शरीरयष्टीपासून ते त्याच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांचे प्रदर्शन करण्याची मजा औरच असते. या हेतूने अनेक श्‍वानप्रेमी आपल्या श्‍वानाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय श्‍वान प्रदर्शनात सहभागी करतात. अशा प्रदर्शनासाठी श्‍वानांचे आरोग्य तंदुरुस्त व सौंदर्य कायम ठेवले जाते. त्यासाठी डॉग कॅरिअर व्हॅन वापरतात. 

दहा-बारा वर्षांपासून ‘कॅनन क्‍लब’सारख्या संस्था राज्य, राष्ट्रीयस्तरावर श्‍वान प्रदर्शन भरविले जाते. यात देशी-विदेशी श्‍वान संगोपन करणारे श्‍वानप्रेमी आपले श्‍वान सहभागी करतात. कोल्हापूरबरोबर मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, बडोदा, सुरत, इंदोर, धारवाड, कारवार, गोवा आदी ठिकाणांहून श्‍वान आणले जातात. या श्‍वानांची वाहतूक करण्यासाठी ‘डॉग कॅरिअर व्हॅन’चा वापर होतो. अशी व्हॅन म्हणजे मोठी चार चाकी रुग्ण वाहिकेसारखीच  रचना असते. कधी आलिशान चारचाकी वाहनाला मागील बाजूच्या हौद्यावर ‘डॉग स्टे होम’ बनविले जाते. पिंजऱ्यासारखा हा भाग असतो. त्याला काचा लावून बंदिस्त केले जाते. यात ‘एससी’ असल्याने आतील हवा थंड राहते. श्‍वानाला झोपण्यासाठी, फिरण्यासाठी मोकळी जागा व कुशन प्रकारातील बेड असतो, तर बाजूच्या एका कप्प्यात श्‍वानाला नैसर्गिक विधी करता येईल, असे स्वच्छतागृह असते. त्यासोबत औषधोपचाराचा कक्ष आहे. पाण्याची टाकी असते. एका तिजोरीत श्‍वानाचे खाद्य आणि बंदिस्त ठेवले जाते, अशी डॉग व्हॅन बहुतांशी मोठ्या शहरातील काही श्‍वानप्रेमी जरुर वापरतात, मात्र अशी डॉग व्हॅन बनवून घेतली जाते. त्यासाठी श्‍वानाचा आकार, वजन, वय, उंची त्याची गुणवत्ता, वापर विचारात घेऊन श्‍वानप्रेमी श्‍वानाच्या गरजेनुसार अशी व्हॅन बनवून घेतात. त्याचा खर्च अंदाजे पाच ते सात लाखांपर्यंत जातो. डॉग शोच्या ठिकाणी श्‍वान घेऊन जाण्यासाठी या व्हॅनचा वापर होतो. श्‍वान जास्त काळात उन्हात राहू नये, याची काळजी घेतली जाते.

कोल्हापुरात पूर्ण क्षमतेने वापर नाही

‘डॉग कॅरिअर व्हॅन’ ही संकल्पना मोठ्या शहरात वापरली जाते, मात्र अजूनही कोल्हापुरात त्याचा वापर पूर्ण क्षमतेने सुरू नाही. कोल्हापुरात शासकीय पशुसंवर्धन विभागाकडे मात्र पशुचिकित्सेसाठी ‘ॲनिमल कॅरिअर व्हॅन’ आहे. विविध प्रकारच्या लसीकरणासाठी, उपचारासाठी या व्हॅनचा वापर होतो, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A dog carrier van is used to transport dogs