esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

dont panic to kolhapur people on corona virus

जिल्ह्यातील बाधितांची संख्या जरी वाढत असली तरी त्यांचा ‘कम्युनिटी स्प्रेड’ फारसा नसल्याने कोल्हापुरवासीयांनी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही.

धीर धरा ! कोल्हापूरवासीयांनो पॅनिक होऊ नका, संख्या वाढत असली तरी ही आहे दिलासादायक बाब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात सहा दिवसांपासून दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी या सर्व बाधितांना त्यांचा अहवाल येण्यापूर्वीच अलगीकरण कक्षात ठेवले होते, त्यामुळे त्यांचा लोकांशी संपर्क झालेला नाही. म्हणून कोल्हापूरवासीयांनी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही. 


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेला तिसरा लॉकडाउन गेल्या आठवड्यात शिथिल करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या इतर जिल्ह्यात अडकलेल्यांना कोल्हापुरात येण्यास तर कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसह इतरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले. गेल्या सात दिवसांत सुमारे १५ ते १६ हजार लोक कोल्हापुरात आले आहेत. यातील मुंबई, पुण्यासह रेडझोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लोकांना सक्तीने अलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यांचा त्याच दिवशी स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविला होता. यापैकी काही जणांचे अहवाल सात दिवसांत पॉझिटिव्ह येत आहेत. 

हे पण वाचा - अखेर मेंढपाळांना स्थलांतरास मिळाली परवानगी पण.... 

आठ दिवसांपूर्वी एकूण बाधितांची संख्या २५ होती, यातील १२ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आज बाधितांची संख्या ६७ वर पोहचली असली तरी गेल्या सात दिवसांत ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, ते सर्व जण अलगीकरण कक्षात आहेत. ज्यादिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल, त्यादिवशी संबंधितांना त्यांना दाखल केलेल्या अलगीकरण कक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 

हे पण वाचा - गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचे तीन नवे रुग्ण... 

जिल्ह्यातील १२ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. उर्वरित सुमारे ८९ जणांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत इचलकरंजीच्या एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्यांची प्रकृत्ती ठणठणीत आहे. एकाचाही मृत्यू होणार नाही, असा दावा या रुग्णांवर उपचार करणाऱ्या सीपीआरमधील डॉक्‍टरांचा आहे. बाधित सर्व जण सीपीआरमध्ये दाखल झाले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या जरी वाढत असली तरी त्यांचा ‘कम्युनिटी स्प्रेड’ फारसा नसल्याने कोल्हापुरवासीयांनी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही.

go to top