जिल्ह्यात पायाभूत सुविधांत दुप्पट वाढ; शासकीय आरोग्य सेवा झाल्या सक्षम 

Doubling of infrastructure in the district; Enabled government health services
Doubling of infrastructure in the district; Enabled government health services
Updated on

कोल्हापूर  : जिल्ह्यातील कोविड खरेदी व त्यातही मास्क, सॅनिटायझर खरेदी वादात सापडली आहे. चढ्या दराने झालेल्या खरेदीवर शासन स्तरावरून कारवाईची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र काही खरेदी ही आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी उपयोगी ठरली आहे.

रुग्णाला आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्टेथोस्कोपपासून ते बेडपर्यंत अनेक अडचणी होत्या. मात्र कोविडमुळे आवश्‍यक बहुतांश सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य संस्थात 9 ते 10 हजार रुग्णांवर उपचार होईल, एवढी व्यवस्था कोरोनाकाळात उभारली आहे. 

कोरोनापूर्वी आरोग्य संस्थांकडे दुर्लक्ष झाले होते. शासकीय दवाखाना म्हणजे ताप, थंडी, खोकल्यावरच आणि फारतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, कुत्रा चावल्यांनतर मिळणारी लस एवढीच ओळख होती. या पलीकडे काही आजार असेल तर खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र कोरोनामुळे हे चित्र बदलून गेले. कोरोना काळात रुग्णांचा व समाजाचा आधार म्हणूनच शासकीय आरोग्य संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. खासगी रुग्णालयात ज्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्या सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. 

कोरोनामुळे विविध साधनसामग्री खरेदी केली. कधी नव्हे ते शासकीय दवाखान्यात सक्‍शन मशीन, इसीजी एक्‍सरे, स्कॅनिंग मशीन, लॅब उपलब्ध झाली आहे. आरोग्य केंद्रात तर केवळ 8 ते 10 लोकांना ऍडमिट करण्याची व्यवस्था होती. काही ठिकाणी तर रुग्णांना जमिनीवरच झोपवून उपचार करावे लागत होते. कोरोनानंतर आरोग्य केंद्रातील बेडची संख्या 10 वरुन 20 झाली. फॅमिली प्लॅनिंगला आवश्‍यक सक्‍शन मशीन मागूनही मिळत नव्हते. ते मिळाले आहे. आवश्‍यक असणारे एक्‍सरे मशीन असो की हजारो रुपये खर्च करून कराव्या लागणाऱ्या विविध चाचण्या असो, या सुविधा आता शासकीय आरोग्य संस्थात उपलब्ध झाल्याने गोरगरिबांचा दवाखान्यासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार असल्याचा दावा, आरोग्य विभागाने केला आहे. 

आरोग्य विभागाला निधीची गरज होती. कोरोनामुळे हा निधी मिळाला. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांकडे किमान 50 कोटींचे साहित्य उपलब्ध झाले आहे. छोट्या, मोठ्या आजारांवरही उपचार करण्याऐवढी साधने आरोग्य संस्थांना मिळाली आहेत. पुढील 20 वर्षांची साधानसामग्री उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांचा हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com