वारणा दूध संघाच्या अध्यक्षपदी डॉ.विनय कोरे यांची तर उपाध्यक्षपदी एच.आर. जाधव यांची बिनविरोध निवड

Dr. Vinay Kore has been appointed as the President of Warana Milk Association and H.R. Unopposed selection of Jadhav
Dr. Vinay Kore has been appointed as the President of Warana Milk Association and H.R. Unopposed selection of Jadhav

वारणानगर (कोल्हापूर)  : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ.विनय विलासराव कोरे (वारणानगर) यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक हिंदुराव रंगराव  तथा एच.आर.जाधव ( बहिरेवाडी ) यांची बिनविरोध निवड झाली. 


वारणा दूध संघाची सन-२०२१ ते २०२६ या सालासाठीची संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी ही पंचवार्षिक निवडणूक वारणा समुहाचे नेते आमदार डॉ.विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली सातव्यांदा  बिनविरोध झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली.यावेळी नवनिर्वाचित संचालक शिवाजीराव कापरे,अभिजीत पाटील,अँड. एन.आर.पाटील, शिवाजीराव जंगम, प्रदीप देशमुख, शिवाजीराव मोरे, राजवर्धन मोहीते,अरुण पाटील,दिपक पाटील,महेंद्र शिंदे,लालासाहेब पाटील,माधव गुळवणी, विजयकुमार पाटील, के.आर.पाटील,मयुर पाटील,डॉ.मिलींद हिरवे, चंद्रशेखर बुवा,शोभा पाटील,शमशाद मुल्ला उपस्थित होते.

डॉ.विनय कोरे म्हणाले, वारणा दूध संघाची ही ऐतिहासिक निवडणूक झाली या पाच वर्षाच्या कालावधीत अनेक आवाहनांना सामोरे जावे लागले अशा काळात संघाने नेत्रदिपक प्रगती साधली संघाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला नावलौकीक वाढवला आहे. वारणा दुध संघाने कॅडबरीसह प्रकल्पात नव्याने अत्याधुनिक विस्तारीकरण सुरू ठेवले असून दुध संकलनाचे उदीष्ठ व नवी विक्री व्यवस्था यावर भर दिली असल्याचे अध्यक्ष कोरे यांनी सांगितले.नूतन उपाध्यक्ष एच.आर.जाधव म्हणाले,अध्यक्ष डॉ.कोरे यांच्या नेतृत्वाखाली संघाचा लौकिक वाढविण्यासाठी  प्रयत्नशील राहणार असल्याची  ग्वाही दिली.

यावेळी अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे,उपाध्यक्ष एच.आर.जाधव यांचा व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार वाशी शाखेचे व्यवस्थापक एस.एम. पाटील व वारणा दूध कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव व सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी अरुण चौगले यांनी तर सहाय्यक निवडणुक अधिकारी  नामदेव दवडते, अँड.शिवाजी यादव, अशोक पाटील,सचिन माने यांनी काम पाहीले.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com