esakal | कंटेन्मेंट झोनचा इचलकरंजी पालिकेलाच फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Due To The Containment Zone, Ichalkaranji Municipality Has To Change The Meeting Place Kolhapur Marathi News

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरात केलेल्या एका कंटेन्मेंट झोनचा फटका पालिकेला बसला आहे.

कंटेन्मेंट झोनचा इचलकरंजी पालिकेलाच फटका

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरात केलेल्या एका कंटेन्मेंट झोनचा फटका पालिकेला बसला आहे. पालिकेची अंदाजपत्रकीय सभा शुक्रवारी (ता. 26) होईल. मात्र, सभेचे ठिकाण घोरपडे नाट्यगृह कंटेन्मेंट झोनमध्ये येत आहे. त्यामुळे सभेचे ठिकाण बदलण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली. 

शहरात पुन्हा हळूहळू कोरोना संसर्ग वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होते. सध्या शहरात नवीन सहा कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यानुसार दोन ठिकाणी पालिकेने मायक्रो कंटेन्मेट झोन तयार केले. त्यातील एक कंटेन्मेट झोन हा नाट्यगृह परिसरात केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची सभा घेण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर सभेचे ठिकाणी बदलण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. सभेचे नवे प्रस्तावित ठिकाण राजीव गांधी सांस्कृतीक भवन केले आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. मुळात जिल्हाधिकारी कार्यालयाने नाट्यगृहात सशर्त ऑफलाईन सभा घेण्यास मंजुरी दिली आहे. पण आता कंटेन्मेंट झोनमुळे सभेचे ठिकाणच बदलावे लागत आहे. 

पालिका सभा नेहमी प्रशासकीय इमारतीत होत असतात. पण सामाजिक अंतरच्या अटीमुळे प्रशस्त अशा घारपडे नाट्यगृहात सभा घेण्यात येत आहेत. विविध सभापती निवडीचा कार्यक्रमही नाट्यगृहामध्येच झाला. पण आता कंटेन्मेंट झोनमुळे राजीव गांधी सांस्कृतीक भवनमध्ये सभा घेण्याचा नवा प्रस्ताव ठेवल्यामुळे प्रशासनाला मात्र त्याची नव्याने तयारी करावी लागणार आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur