'शेतात पाणी हाय म्हणून रस्त्यावर मळणी काढलीया'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

भातपीक मळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने भातपिकाची रस्त्यावर मळणी केले जात आहे. 

कोनवडे (कोल्हापूर)  : परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतं पाण्याने व गाळाने भरली आहेत. त्यामुळे कापणी केलेले भातपीक मळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने भातपिकाची रस्त्यावर मळणी केले जात असल्याचे चित्र भुदरगड तालुक्यातील मिणचे, कुर, हेदवडे परिसरात दिसत आहे.

हेही वाचा - हाताशी आलेले पीक बघता बघता होते फस्त -

शेतात झोडणी करण्यासाठी व खळ्यासाठी कोरडी जागा नसल्याने चिखलातून भाताची वाहतूक करून रस्त्यावर मळणी सुरू असल्याचे चित्र भुदरगड तालुक्यासह सर्वत्र पहावयास मिळत आहे. चार महिने पावसाने धुमाकूळ घातला व पुरामुळे भात आणि ऊससहित इतर पिके उध्वस्त झाली. परतीच्या पावसानेही कहर केला. त्यामुळे पुरातून बचवलेला हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार या भीतीने गाळातूनच भात कापनीस बळीराजाने सुरवात केली. 

सध्या शेतात अद्याप चिखल असल्याने खळ्यावरची किंवा खाटल्यावरील भाताची झोडणी शेतात कोरडी जमीन उपलब्ध नसल्याने शेतकरी भात कापणी करून रस्त्यावर धोकादायकरित्या मळणी करताना दिसत आहे. जनावरांसाठी आवश्यक असणारे पिंजर देखील रस्त्यावरच सुकवावे लागत आहे. भुदरगड तालुक्यासह सर्वत्र रस्त्यावरची मळणी पहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजावर धोकादायकरित्या रस्त्यावर मळणी करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा -  सावधान ! मध्यरात्रीला चोरी होतायेत लाखोंच्या किमतीचे कारटेप -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to heavy rain the water in farm and working of farming on road in kolhapur village area