पहाटेच नैवेद्य पाहून कावळही बावरले.. 

Early in the morning, after seeing Naveda, Kavala was also drunk.
Early in the morning, after seeing Naveda, Kavala was also drunk.
Updated on

कोल्हापूर  : रक्षाविसर्जन सोहळा म्हणजे, स्मशानभूमीतील खूप भावनिक विधी, कावळ्याने नैवेद्याला टोच लावल्याशिवाय हा विधी पूर्ण होत नाही, साधारण या विधीची वेळ सकाळी नऊ ते दहायावेळेत असते; पण आज पहिल्यांदाच रक्षाविसर्जन विधी पहाटे पाच वाजल्याच्या सुमारात झाले. एवढ्या लवकर स्मशानातील चितेच्या जागी ठेवलेला नैवेद्य पाहून नेहमीचे कावळे ही काहीकाळ बावरले. जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर आज हे विधी लवकरात लवकर उरकून घेतले. आणीबाणीच्या प्रसंगी प्रथा-परंपरांनाही काही काळासाठी बाजूला कसे ठेवावे लागते, याचे प्रत्यंतर यानिमित्ताने आले. 

आज जनता कर्फ्यु होणार असे जाहिर झाल्याने आज रक्षाविसर्जन असलेल्या कुटुंबियांनी काल रात्री संपर्क साधून रक्षाविसर्जन सकाळी लवकर करुन घेणार असल्याचे सांगितले. स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनीही सहकार्याची भूमिका घेतली. रक्षाविसर्जनासाठी मोजकेच नातेवाईक व पारंपरिक नैवेद्यासह चार कुटुंबिय रक्षाविसर्जनासाठी आले. 

साधारण रक्षाविसर्जन व चितेच्या जागी वेगवेगळे नैवेद्य ठेवण्याची वेळ सकाळी नऊ ते साडेनऊ असते. या वेळेतच नैवेद्य येत असल्याने स्मशानात कावळ्यांची गर्दीही याच वेळेत असते. किमान 60 ते 70 कावळे यावेळी स्मशान शेडवरील लोखंडी अँगलवर येऊन या काळात बसतात. चितेवर नैवेद्य ठेवला की, तो नैवेद्य टिपण्यासाठी खाली उतरतात. किंबहूना कावळा कधीही नैवेद्य शिवतो, याकडेच नातेवाईक डोळे लावून थांबलेले असतात. कावळा नैवेद्याला शिवला की, अंत विधी खऱ्याअर्थाने झाला असे मानले जाते. आज पहाटे म्हणजे कावळ्यांना सवयी नसलेल्यावेळी स्मशानात नैवेद्य ठेवला गेल्याने बराचवेळ कावळे नैवेद्याकडे फिरकलेच नाहीत. अर्थाच नातेवाईकांनी चितेच्या जागी हात जोडून नमस्कार करुन रक्षाविसर्जनाला प्राधान्य दिले. यापुढे पहाटे पाच ते सकाळी सहा यावेळेत चार रक्षाविसर्जन विधी पूर्ण झाले. 

लोकांनी दक्षता घ्यावी. अंत्यविधी आणि रक्षाविसर्जन विधी भावनिक आहेत. त्यासाठी गर्दी करु नका. हे लोकांना समजावून सांगण्यात अडचणी होत्या; पण आम्ही काल अंत्यविधी झालेल्या मृताच्या नातेवाईकांना रक्षाविसर्जनासाठी मोजकेच लोक याठिकाणी या, अशी दबकत विनंती केली. पण लोकांनी विनंतीला प्रतिसाद दिला. अवघे चार ते पाच लोक रक्षाविसर्जनासाठी आले. आता येथून पुढे कोरोनाच्या याच आणीबाणीच्या काळात अशीच दक्षता लोकांनी घ्यावी. 
- अरविंद कांबळे, स्मशानभूमी प्रमुख. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com