esakal | निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; मतदानकेंद्र निश्‍चिती, कर्मचारी नियुक्ती पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Elections in Pune Graduate and Teacher Constituency Administration ready for elections

मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे.

निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; मतदानकेंद्र निश्‍चिती, कर्मचारी नियुक्ती पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. प्रशासनानेही याची जय्यत तयारी केली. मतदानकेंद्र निश्‍चिती, कर्मचारी नियुक्ती, मतपत्रिका, मतपेट्या यांचेही नियोजन झाले. अन्य तयारीही अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन करूनच मतदान होईल.


पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदार नोंदणी झाली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून जिल्ह्यातील सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारीही अधिक असण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनानेही तयारी केली. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची निश्‍चिती झाली आहे. निवडणुकीसाठी मतपत्रिका असतात. त्याचीही उपलब्धता लवकरच होणार आहे. मतपेट्या आणि कर्मचाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रियाही पूर्ण झाली असून, लवकरच ती जाहीर करण्यात येईल. मतपेट्या असल्याने सुरक्षेसाठी पुरेसा बंदोबस्त दिला जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काळजी घेत मतदान प्रक्रिया होईल.

हेही वाचा- कोल्हापुरात आहे प्रदूषणमुक्तीचे आदर्श मॉडेल; धुण्याची चावी, तलाव

शिक्षक मतदारसंघ 
मतदान केंद्रे
७६

पदवीधर मतदान केंद्रे
२०५

मतपेट्या ५६२

पदवीधर मतदारसंघ जिल्हानिहाय मतदार

पुणे ३६ हजार ६११ 

कोल्हापूर ८९ हजार ५२९


सांगली ८७ हजार २३३ 


सातारा ५९ हजार ७१

सोलापूर ५२  हजार ७४५

शिक्षक मतदारसंघ जिल्हानिहाय मतदार

पुणे -  ३२ हजार २०१ 
सोलापूर - १३ हजार ०१२

कोल्हापूर-  १२ हजार २३७ 

सातारा - ७ हजार ७११
सांगली -६ हजार ८१२ 

संपादन- अर्चना बनगे