लॉकडाउनमुळे घरात असल्याने विजेचा वापर जास्त

the electricity consumption is higher in the house
the electricity consumption is higher in the house
Updated on

कोल्हापूर : जवाहरनगर, शास्त्रीनगर आणि राजर्षी शाहूनगर वसाहतीमधील महिला आणि नागरिकांनी आज वाढीव वीज बिलांसंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लॉकडाउनमुळे नागरिक घरात असल्याने विजेचा वापर जास्त झाल्याने मंडळाने सरासरीने बिल आकारले आहे, अशा शब्दांत वाढीव बिलांचे समर्थन करणाऱ्या अधिकाऱ्यांना नगरसेवक नियाज खान आणि नागरिकांनी सुनावले. गोंधळानंतर अधिकाऱ्यांनी पुन्हा मीटर रीडिंगप्रमाणे बिल देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. 

वीज मंडळाकडून तीन महिने मीटर रीडींग न घेता सरासरी बिल पाठवणार असल्याचे सांगितले; पण सरासरी काढताना तफावत झाल्याचे नागरिकांनी आपली बिले दाखवून अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. 700 ते 800 रुपयांचे बिल असणाऱ्या ग्राहकांना तीन महिन्यांचे साडेपाच हजार तर चारशे रुपयापर्यंत बिल येणाऱ्या परिवाराला अडीच हजारपर्यंत तीन महिन्यांचे बिल का भरावे याचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही. 

लॉकडाउनमध्ये रीडिंग न घेतल्यानंतर अनेकांना तिप्पट बीले पाठवली. जवाहरनगर, शास्त्री आणि राजर्षी शाहूनगर वसाहतीमधील नागरिकांनी वाय. पी. पोवारनगरमधील मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढून बिलांची होळी केली.  

आंदोलनातचे नेतृत्व नगरसेवक नियाज खान यांनी केले. मोर्चात रविकिरण गवळी, जीवन पाटील, अमर चव्हाण, गणेश पालकर, अलका ढवळे, विद्या घोरपडे, कविता पाटील, लक्ष्मी पाटील, कांचन लाखे, अमोल पाटील आदि नागरीक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गेल्या वर्षीची सरासरी 
गेल्या वर्षीचा मे महिन्यातील बिलाप्रमाणे आकारणी केलीय शिवाय यावेळी सर्वजण लॉकडाऊनमुळे घरी असल्याने फॅन आणि टीव्हीसाठी विजेचा वापर अधिक झाल्याने बिले भरावी लागतील, असे उदाहरण दिल्याने नागरिक संतप्त झाले. त्यानंतर पुन्हा मीटर रीडिंग घेऊन त्या फरकाचे बिबील पाठवण्याचे आश्‍वासन दिले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com