esakal | VIDEO : सेनापती कापशीच्या परिसरात पहिल्यांदाच टस्कर ; बघ्यांची गर्दी

बोलून बातमी शोधा

elephant entry in kolhapur kagal people seen today morning}

कामत नावाच्या देसाई वस्ती जवळील रस्त्याकडेच्या शेतातून गावाशेजारी आलेला टस्कर पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली.

kolhapur
VIDEO : सेनापती कापशीच्या परिसरात पहिल्यांदाच टस्कर ; बघ्यांची गर्दी
sakal_logo
By
प्रकाश कोकितकर

सेनापती कापशी (कोल्हापूर) : आज सकाळी सहाच्या सुमारास कापशी परिसरात प्रथमच टस्कराचे दर्शन झाले. बाळेघोल (ता.कागल) येथील जंगलातून आलेला हा टस्कर सकाळीच्या सुमारास बाळेघोल ते कापशी मार्गावरील मारुती माळ येथे फिरायला जाणाऱ्या लोकांना दिसला. त्यानंतर त्याने आंबेओहळ पुलाजवळून तमनाकवाडा हद्दीत प्रवेश केला. तमनाकवाडा येथील कामत नावाच्या देसाई वस्ती जवळील रस्त्याकडेच्या शेतातून गावाशेजारी आलेला टस्कर पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली.

तरुण अक्षरशः फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी त्याच्या मागे धावत होते. यामुळे बिथरलेला टस्कर काही काळ उसातच थांबला. तो रस्ता पार करून पुन्हा बाळेघोल हणबरवाडी गावाला लागून असलेल्या डोंगराकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे तो बिथरत होता. धोका असूनही अनेक तरुण आणि युवक त्याच्या मागे लागले होते. वन विभागाचा एक कर्मचारी येथे उपस्थित होता.

हेही वाचा - इचलकरंजीत अवैध जुगार व्यवसायावर मोठी कारवाई ; बड्या लोकांची नावे? -

मात्र तो काही करू शकत नव्हता. रस्त्यावर गर्दी वाढल्यामुळे नऊच्या सुमारास रस्ता पार करून टस्कर पुन्हा बाळेघोल, हणबरवाडी च्या दिशेने उसाच्या व ज्वारीच्या पिकातून पुढे गेला. या वेळीही युवक त्याच्या मागे लागलेले होते. गावच्या एसटी स्टॅण्ड जवळ घरे आहेत. तसेच ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या आहेत. येथूनच तो बाळेघोलच्या दिशेने गेला. यावेळी तरुण, युवक त्याच्या मागे लागले होते.

संपादन - स्नेहल कदम