एंन्टरटेनमेंट स्किल्सनाही मिळणार संधी 

Entertainment skills will also be available
Entertainment skills will also be available
Updated on

कोल्हापूर : केवळ गौरवशाली इतिहासाचाच अभिमान न बाळगता त्याबरोबरीनेच बदलत्या काळाबरोबर येथील नव्या पिढीने आता बदलते तंत्रज्ञानही आत्मसात केले आहे. त्यामुळे येथे नव्याने शुटींग वाढत असताना त्यांच्या या एंन्टरटेनमेंट स्किल्सनाही झळकण्याची संधी मिळणार आहे. अर्थातच करियरसाठी पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांकडे जाणारे तरूणांचे लोंढे थांबणार आहेत. 

शहर आणि जिल्ह्यात अभिजात कलेचे शिक्षण देणारी पाच महाविद्यालये असून, बदलत्या जगाला सामोरे जाताना आता कलाशिक्षणाला फिल्ममेकिंगची जोड मिळाली आहे. शिक्षण घेत असतानाच शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून तरुणाई या क्षेत्रात दमदार एंट्री करू लागली आहे. कला शिक्षणासाठी प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी हे शिक्षण घेत असतानाच फोटोग्राफी, डॉक्‍युमेंटरी, व्हिडिओ एडिटिंग, वॉल पेंटिंग, ग्राफिक डिझायनिंग अशी विविध कामे करून, स्वतःच्या शिक्षणाचा खर्च करतात. शिक्षणानंतर येथील काही तरूण संजय लीला भन्साळी, नितीन चंद्रकांत देसाई अशा दिग्गजांच्या टीममध्ये सध्या कार्यरत आहेत. 

शॉर्ट फिल्मची चळवळही येथे व्यापक झाली असून जगातील विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच नव्हे तर अगदी फिल्मफेअर ऍवार्डपर्यंत येथील तरूणाईने धडक मारली आहे. प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक सुभाष घई, प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी येथे विविध कौशल्य अभ्यासक्रमांसाठी यापूर्वीच तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने येत्या काळात सकारात्मक प्रयत्न झाल्यास जागतिक दर्जाची स्किल्सही येथे शिकता येणार आहेत. 

अभिनय, गायन, वादन, नृत्य, रेकॉर्डिंगसह ऍनिमेशन, व्हीएफएक्‍स, एडिटिंग आदी प्रशिक्षण देणाऱ्या सध्या पस्तीसहून अधिक संस्था कार्यरत आहेत. ऍनिमेशनचा बेसिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याच महिन्याला पाचशेहून अधिक आहे. मनोरंजनातील नव्या प्रवाहांना नेटाने सामोरे जाताना शहर आणि जिल्ह्यात दीडशेहून अधिक यू ट्यूब चॅनल्स सुरू झाली आहेत. त्यातील 50 ते 60 चॅनल्स पूर्णपणे कमर्शियल आहेत. 

अभिजात नृत्यशैलींबरोबरच विविध नृत्यशैलींचे प्रशिक्षण देणाऱ्या चाळीसहून अधिक संस्थांनी आता नृत्यात करिअरच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर डान्स असोसिएशनच्या माध्यमातून ही मंडळी एकवटली आहेत. 

दृष्टीक्षेपात संधी... 
- एंटरटेनमेंट स्किल्स देणाऱ्या विविध संस्था ः 75 
- वर्षाला प्रशिक्षित विद्यार्थी संख्या ः सुमारे 1200 
- जिल्ह्यातील यू ट्यूब चॅनेल्सची संख्या ः 150 

असाही सकारात्मक परिणाम 
निर्मितीनंतरच्या प्रक्रियेत एडीटींग करणारी युनिटस्‌ महत्वाची असतात. अशी काही युनिट सध्या येथे कार्यरत आहेतच. त्याशिवाय कोल्हापुरात शुटींग वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाल्यानंतर मुळचे कोल्हापूरचे पण सद्या मुंबईत अशी कामे करणाऱ्या पस्तीसहून अधिक तरूणांनी संपर्क साधला आहे. ते त्यांच्या सेटअपसह येथे येवून काम करण्यास तयार असल्याचे अष्टविनायक मीडिया अँड एंटरटेन्मेंटचे संग्राम पाटील यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com