फाउंड्री द्योजक फिटलिंगला नडले ः परप्रांतिय कामगारांना विमानाने आणले

अभिजित कुलकर्णी
बुधवार, 1 जुलै 2020

परप्रांतीय मजुरांनी कामावर हजर होण्याची तयारी दर्शवली आहे, अशाना शासकीय परवानगी घेऊन परत आणण्यासाठी अनेक उद्योगांनी प्रयत्न सुरू केले आहेत. इतर राज्यातून आल्याने चौदा दिवस विलगीकरण कक्षात रहावे लागेल. या चौदा दिवसांचा खर्च संबंधित कंपनीने करावयाचा आहे.

नागाव / कोल्हापूर : फाउंड्री उद्योगात फिटलिंगचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना विमानाने कोल्हापुरात आणण्यात आले. त्यामुळे फाउंड्री उद्योगातील सगळ्यात निकृष्ट दर्जाचे मानले जाणाऱ्या फिटलिंग मजुरांना विमानाने प्रवास करण्याचा सन्मान मिळाला आहे. चौदा दिवसांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन पूर्ण झाल्यावर हे मजूर प्रत्यक्षात कामास सुरुवात करणार आहेत. तोपर्यंत सर्व खर्च कंपनी करणार आहे. 

स्थानिक कामगारांना प्राधान्य मिळावे, यासाठी मोठ्या उद्योगांनी लेबर कॉन्ट्रॅक्‍टर मार्फत स्थानिक कामगारांचा शोध घेऊन त्यांना कामाचे ट्रेनिंग देण्यासाठी सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या ट्रेनिंगच्या काळात त्यांना काही प्रमाणात वेतनही देण्याची तयारी दर्शवली आहे. असे कामाची गरज पाहता राज्यातून परत गेलेल्या कामगारांना ठेकेदारांमार्फत पुन्हा कामावर येण्यासाठी संपर्क सुरू आहेत. ज्या परप्रांतीय मजुरांनी कामावर हजर होण्याची तयारी दर्शवली आहे, अशाना शासकीय परवानगी घेऊन परत आणण्यासाठी अनेक उद्योगांनी प्रयत्न सुरू केले आहेत. इतर राज्यातून आल्याने चौदा दिवस विलगीकरण कक्षात रहावे लागेल. या चौदा दिवसांचा खर्च संबंधित कंपनीने करावयाचा आहे. त्यामुळे अनेक फाउंड्री उद्योगात स्थानिक कामगारांना प्राधान्य देवून त्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. 
फाउंड्री उद्योगात होणारे फिटलिंगचे काम अतिशय कष्टाचे असल्याने स्थानिक मजूर या प्रशिक्षणास प्रतिसाद देत नसल्याने उद्योजकांना पर्याय शोधावा लागणार आहे. लॉकडाऊन नंतर पुढील तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात मालाचा उठाव होणार असल्याचे समजते. परिणामी वेळेत उत्पादन पूर्ण करणे हे उद्योगासमोरील आव्हान असणार आहे. विशेषता ट्रॅक्‍टरसाठी काम करणारे फौंड्री उद्योग सध्या 70टक्केच्या आसपास उत्पादन घेत आहेत. फाउंड्री उद्योगातील उत्पादित माल फिटलिंग न झाल्यास वेळेत पुरवठा होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत काही उद्योजकांनी कंपनीच्या खर्चाने परप्रांतीय मजुरांना विमानाने कोल्हापुरात आणण्याचे निर्णय घेऊन त्यांना परत बोलावले आहे. 

ट्रॅक्‍टरच्या सुट्या भागांचे उत्पादन घेणाऱ्या फाउंड्री उद्योगांना सध्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स उपलब्ध आहेत. त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी स्थानिक मजुरांना प्रशिक्षित करून तात्काळ कामावर हजर करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना प्रशिक्षित करून कामावर हजर करून घेण्यात येईल. 
आनंद देशपांडे 
व्यवस्थापकीय संचालक साउंड कास्टिंग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneurs hit Fitling: workers of other state brought by plane