बूट, चप्पलही आता असणार "स्टॅर्डर्ड' ; जुलैपासून कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात 

लुमाकांत नलवडे 
Tuesday, 23 February 2021

दैनंदिनी जीवनात चप्पल आणि बुट हे दोन्ही वापरले जाते. घरी आणि घराबाहेरसुद्धा याचा वापर होतो.

कोल्हापूर  : दैनंदिनी जीवनात चप्पल आणि बुट हे दोन्ही वापरले जाते. घरी आणि घराबाहेरसुद्धा याचा वापर होतो. काही कंपन्यांमध्येही कामगारांसाठी त्याचा उपयोग होतो. त्याचेही "स्टॅर्डर्ड' (दर्जा) असावा, असा कायदाच आता केंद्र शासनाने केला आहे. चामड्याबरोबरच रबर आणि "पॉलेमेरिक' मधून उत्पादन करणाऱ्यांना "आयएसआय' मार्क घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले असले तरीही त्याची माहिती सर्वांना नाही. कायद्याची माहिती उत्पादकांना व्हावी, यासाठी आज शास्त्रज्ञ राकेश मीना आणि किर्ती दस (दिल्ली) यांनी येथे प्रबोधन केले. रबर आणि पॉलिमेरिक पद्धतीच्या बुट,चप्पल,सॅण्डेल, स्लीपर अशा सर्वच उत्पादकांना आयएसआय मार्क घेणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यामुळेआता बूट आणि चप्पलही दर्जेदार असणार आहे. त्याचाही दर्जा तपासला जाणार आहे. केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडीयन स्टॅण्डर्ड (बीएसआय) कायद्या 2016 नुसार ही सक्ती केली आहे. यासाठी चप्पल आणि बूट निर्माण करणाऱ्या सर्वांनाच 1 जुलैपूर्वी "आयएसआय' मार्क घ्यावा लागणार आहे. 1 जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. तत्पूर्वी उत्पादन, इंपोर्ट, विक्री, साठा, आणि प्रदर्शनातून विक्री यांनी आयएसआय मार्क घेणे आवश्‍यक आहे. एक जुलैनंतर मात्र याबाबतची कारवाई होणार आहे. 

हेही वाचा- कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवेला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद

बीएसआय ऍक्‍ट 2016च्या सेक्‍शन 17 नुसार एक जुलैनंतर आयएसआय मार्क नसलेल्या चप्पल,बुट,स्लिपरच्या विक्रेत्यांवर, डिलरवर, उत्पादकांवर कारवाई होऊ शकते. यामध्ये त्यांना लाखात दंड किंवा दोन वर्ष कैद किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. आयएसआय मार्क घेण्याची प्रक्रीया ऑनलाईन होऊ शकते. वेबसाईटवर त्याची माहिती आहे. 

कोल्हापुरी चप्पलचा समावेश नाही 
कोल्हापुरी चप्पल हे सुद्धा लेदर (चमड्यातील) एक भाग आहे. मात्र कोल्हापुरी चप्पलचा समावेश या नवीन कायद्यात होऊ शकत नाही. त्याची उत्पादन प्रक्रीयाही "हॅण्डमेड' असल्यामुळे त्याचा या कायद्यात सहभाग नसल्याचेही काही उत्पादकांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना बीएसआयच्या शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले. 

सर्व चप्पल,बूट उत्पादकांनी त्यांच्या उत्पादनात क्वॉलीटी व कंट्रोल योग्य ठेवणे आवश्‍यक आहे. क्वालीटी,कंट्रोल ऑर्डरसाठी 
बीएसआयकडे अर्ज करा आणि भारतीय दर्जेदार उत्पादनाचे उत्पादन बनवा 
- हेमंत बी, विभाग प्रमुख, बीएसआय, पुणे  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everyone makes slippers and shoes ISI mark before July 1st footwear law marathi news kolhapur