
हातकणंगले (कोल्हापूर) : जनसुराज्यचे माजी आमदार राजीव किसनराव आवळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून, लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यांत राष्ट्रवादीमध्ये असलेली पोकळी भरून निघण्यास मदत होईल, असा जाणकारांचा कयास असून मतदारसंघातील राजकीय समीकरणे मात्र निश्चितच बदलणार आहेत.
वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी ते इचलकरंजीचे नगराध्यक्ष झाले. जनसुराज्यव्या तिकिटांवर निवडणूक लढवत त्यांनी २५ वर्ष आमदार असलेल्या चुलते जयवंतराव आवळे यांना २००४ मध्ये पराभूत केले. गेली पंधरा वर्ष ते जनसुराज्यमध्ये कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी इचलकरंजीसह तालुक्यांत स्वतःचा गट निर्माण केला. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे २०१९ मध्ये जनसुराज्यने त्यांना डावलले.
काँग्रेसमध्ये त्यांना जयवंतराव आवळे, आमदार राजूबाबा आवळे यांच्याकडून तीव्र विरोध निश्चित आहे. भाजपमध्ये जायचे तर सुरेश हाळवणकर, अरुण इंगवले यांची मनधरणी करावी लागणार, शिवसेनेत त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा विरोध अपेक्षितच होता. अशा स्थितीत राष्ट्रवादी हाच त्यांच्यासमोर पर्याय आहे. राष्ट्रवादीतील अनेक मंत्री, नेत्यांचे त्यांचे पूर्वीपासून निकटचे संबंध आहेत. अशातच मदन कारंडे व राष्ट्रवादी प्रदेशच्या महिला उपाध्यक्ष प्रविता सालपे यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला, शिवाय जयंत पाटील यांनीही वरिष्ठांपर्यंत चर्चा करून आवळेंचा प्रवेश निश्चित केला आहे.
आवळेंचा संपर्क दांडगा
जनसुराज्यमध्ये राजू आवळे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. वारणा समूहातील अनेक नेते, संचालक त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत आणखी कोण कोण राष्ट्रवादीत जाणार हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.