अंत्यसंस्कार पडले महागात ः स्मशानभूमीतच न्यायला आले पोलिस

प्रतिनिधी
मंगळवार, 30 जून 2020

या घटनेने प्रशासन सतर्क झाले असून अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या सुमारे 25 जणांना स्मशानभूमीतच थांबून ठेवण्यात आले. यातील पाच जण तीव्र संपर्कात आले आहेत. या सर्वांना आयजीएम रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 

इचलकरंजी  ः येथील गावभाग परिसरातील त्रिशूल चौकातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्याच्यावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले; मात्र त्याच वेळी त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या सुमारे 25 जणांना थेट स्मशानभूमीतून ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 
या वृद्धाला ताप येऊन धाप लागली होती. त्यामुळे आज दुपारी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा स्वॅब घेऊन तातडीने तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आला. त्या वृद्धाला सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी येथील पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. याच वेळी या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

एक यंत्रमाग कारखाना सील 
कुडचे मळा परिसर सध्या प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यानंतरही एक यंत्रमाग कारखाना सुरू होता. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने हा कारखाना आज बंद करुन सील केला. प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्व यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. 
दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने पालिकेने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. दिवसभरात 259 नागरिकांवर कारवाई करीत 25,900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
नातेवाईकांचे स्वॅब घेणार 
त्रिशूल चौकातील वृद्धाच्या मृतदेहाला घरी आणल्यानंतर आंघोळ घालण्याचा विधी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांसह सात नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.
शहरातील दुसरा मृत्यू 
यापूर्वी कोले मळा येथील एका वृद्धाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्रिशूल चौकातील वृद्धाच्या मृत्यूनंतर शहरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या दोनवर पोचली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expensive funeral: Police came to take him to the cemetery