लग्न पडले महागात ः वराती ऐवजी दवाखान्यात जाण्याची वेळ का आली ते वाचा

लग्न पडले महागात ः वराती ऐवजी दवाखान्यात जाण्याची वेळ का आली ते वाचा
Updated on

सरवडे : मजरे कासारवाडा, (ता. राधानगरी जि. कोल्हापूर) येथील सुतार कुटुंबीयांच्या लग्नकार्यात झालेल्या जेवणावळीतून विषबाधा झाली आहे. यामध्ये 95 हून अधिक लोकांना जुलाब उलट्याआणि मळमळ असा त्रास होऊ लागल्याने कसबा वाळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच यामध्ये 35 पट्टणकोडोलीतील लोकांचा समावेश आहे. काहीजणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे या घटनेतील रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. बाधित रुग्णांच्या वर तालुका वैद्यकीय अधिकारी आर. आर. शेट्टी व त्यांचे पथक उपचार करत आहेत 
मजरे कासारवाडा येथे दिगंबर विजय सुतार यांचे आज दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी लग्नकार्य झाले. दरम्यान, ग्रामस्थ व पाहुणे जेवण करून गेल्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्यांना उलट्या जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला एकदम अचानक सुरू झालेल्या त्रासामुळे गावात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले काही काळ सर्वांची धावपळ सुरू झाली. तत्काळ बिद्री संचालक युवराज वारके सरपंच बाबूराव जाधव आणि ग्रामस्थांनी रुग्णांना कसबा वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले काहींजणांवर खासगी रुग्णालयात उपचार केले. तालुका आरोग्य अधिकारी आर. आर. शेट्टी यांच्यासह 10 डॉक्‍टर आणि 20 कर्मचारी यांच्या पथकाने उपचार सुरू केले. 
या संदर्भात डॉ. शेट्टी म्हणाले, ""लग्नकार्यात शाकाहारी जेवण होते. यामध्ये मसालेभात रबडी बटाटे भाजीचा समावेश होता. तपासणीसाठी अन्नाचे नमुने घेतले आहेत. कसबा वाळवे दवाखान्यात चार वर्षाची बालिका, 11 महिला, दहा वर्षाच्या आतील अकरा मुले, तर 17 पुरुष आहेत, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले दवाखान्यात माजी उपसभापती अरुण जाधव जि. प. सदस्य वंदना जाधव, सरपंच अशोक फराकटे यांनी भेट दिली. 
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील वधू पक्षातील सुमारे 35 जणांना तर मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील वर पक्षातील 60 जणांना लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. 
पट्टणकोडोली येथील अनिल लोहार यांच्या मुलीचे राधानगरी तालुक्‍यातील मजरे कासारवाडा येथील विजय सुतार यांच्या मुलाशी आज लग्न झाले. दुपारी 12 वाजल्यापासूनच जेवण सुरू होते. यानंतर समारंभानंतर वधूपक्ष घरी आला. रात्रीच्या सुमारास लग्नात जेवलेल्यांना अस्वस्थ वाटू लागले. तसेच काहीजणांना जुलाब व उलट्या सुरू झाल्याने गावातीलच खासगी रुग्णालयाकडे त्यांनी धाव घेतली. पाहता पाहता ही संख्या 35 च्या वर गेल्याने गावात एकच गोंधळ निर्माण झाला. यातील काही जणांना सलाईन लावण्यात आले. तर काहींना तात्पुरता औषधोपचार करून घरी पाठवण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com