15 गुंठ्यात पिकवले 34 पोती भात  ; सडोलीतील शेतकऱ्याचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

भात लावण्यासाठी त्यांनी "शुभांगी' या संकरित बियाणाची निवड केली.

शिरोली दुमाला (कोल्हापूर)  : सडोली दुमाला (ता. करवीर) शेतकरी दीपक भिकाजी कांबळे यांनी आधुनिक शेती तंत्राच्या साहाय्याने आपल्या 15 गुठ्यांत 35 पोती भात उत्पादन घेतले. 
दीपक ग्रामपंचायतमध्ये डेटा ऑपरेटरचे काम करतात. त्यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करण्याचे ठरविले. 

हेही वाचा- महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहा

भात लावण्यासाठी त्यांनी "शुभांगी' या संकरित बियाणाची निवड केली. रोटावेटरच्या साहाय्याने रानाची मशागत करत चार ट्रॉली शेणखत घातले व कुरीच्या साहाय्याने भाताची पेरणी केली. भात उगवून आल्यानंतर दोन वेळा भांगलण करून पिकाच्या वाढीसाठी 22 किलो युरिया खताचा वापर केला. तुडतुडे, भुंगा, खोडकिड नियंत्रणासाठी दोन वेळा औषध फवारणी केली. त्यामुळे भाताला लोंब्या चांगल्या पडल्या. यासाठी गावातील ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्राचे रामदास साळोखे यांनी मार्गदर्शन केल्याचे दीपक कांबळे यांनी सांगितले.  

हेही वाचा-विडी वळणाऱ्या शिवूडकर मावशी महिला अत्याचाराविरोधातील चळवळीत अग्रेसर -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiment of a farmer in Sadoli 34 bags of rice grown in 15 bags