गडहिंग्लज (कोल्हापूर) : आयटीआय प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे सुरू असणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत २१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पर्याय भरण्यासाठीही सहा दिवसांची मुदत आहे. प्रवेशासाठी एकूण पाच फेऱ्या होतील.
यंदा १ ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या या प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता १४ ऑगस्ट ही अंतिम मुदत होती.
कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुदतवाढ करण्यात आली. राज्यात ४१७ शासकीय, तर ५६९ खासगी आयटीआय आहेत. यात एक लाख २५ हजार ६३२ विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे. राज्यात आजअखेर एक लाख ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी एक लाख २७ हजार ९८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले.
प्रवेशप्रक्रियेचा तपशील अंतिम तारीख
ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे २१ ऑगस्ट
पहिली फेरी पर्याय भरणे २१ ऑगस्ट
कच्ची गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट
गुणवत्ता यादीबाबत हरकती २६ ऑगस्ट
तीन गुणवत्ता यादी २७ ऑगस्ट
पहिली प्रवेश यादी ३० ऑगस्ट
पहिल्या यादीतील प्रवेशासाठी १ ते ४ सप्टेंबर
दुसरी फेरी पर्याय भरणे १ ते ५ सप्टेंबर
दुसरी प्रवेश यादी ९ सप्टेंबर
दुसऱ्या यादीतील प्रवेशासाठी १० ते १४ सप्टेंबर
तिसऱ्या फेरीसाठी पर्याय १० ते १५ सप्टेंबर
तिसरी यादी १८ सप्टेंबर
तिसऱ्या यादीतील प्रवेश १९ ते २३ सप्टेंबर
चौथ्या फेरीसाठी पर्याय १९ ते २४ सप्टेंबर
चौथी यादी २८ सप्टेंबर
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.