पॅलिटेक्‍निक प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

Extension For Polytechnic Admission Kolhapur Marathi News
Extension For Polytechnic Admission Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॅलिटेक्‍निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबरअखेर ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. तीन आक्‍टोंबरला कच्ची, तर 8 आक्‍टोंबरला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 

केंद्रीय पध्दतीने पालिटेक्‍निक प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा 10 ऑगष्टपासून आनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची प्रकिया सुरू झाली. कोरोनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना कोणत्याही संस्थेत न जाता इंटरनेट असणाऱ्या मोबाईल, कॅम्युटरवरुन अर्ज भरण्याची सोय केली आहे. पंरतु, यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले अद्याप विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले नाहीत.

दहावीची मुळ गुणपत्रिका, शाऴा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांच्या ताब्यात मिळाल्या आहेत. पण, उत्तपन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर दाखला आदी कागदपत्रे मिळण्यात विलंब लागत आहे. अशा कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आलेले नाहीत. 

प्रवेशप्रक्रियेसाठी तिसऱ्यांदा मुदत वाढविल्याने दाखले मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबर अखेर http://poly20.dtemaharashtra.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. कच्च्या यादीवर सहा आक्‍टोंबरअखेर हरकत घेण्यासाठी मुदत आहे. प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर जाहीर होणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रकातून कळविले आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com