गडहिंग्लज तालुक्‍यातील "एवढ्या' कुटुंबांना मिळणार मोफत नळ जोडणी

Families In Gadhinglaj Taluka Will Get Free Water Connection Kolhapur Marathi News
Families In Gadhinglaj Taluka Will Get Free Water Connection Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : केंद्र शासनाने महत्वाकांक्षी जल जीवन मिशन कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत घर तिथे नळ जोडणीचे नियोजन आहे. पण, हे लक्ष्य वाटते तितके सोपेही नाही. कारण, गडहिंग्लज तालुक्‍यातील 16 हजार 148 कुटुंबांकडे अद्याप वैयक्तिक नळ जोडणी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण कुटुंबाच्या तुलनेत ही संख्या 35 टक्के इतकी आहे. आता या कुटुंबांना मोफत नळ जोडणी देण्याचे "लक्ष्य' आहे. त्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून आर्थिक तरतूद केली आहे. तसेच जल जीवन मिशनमधूनही निधी उपलब्ध केला जाणार आहे. 

मुबलक पाणी हा प्रत्येक कुटुंबाचा अधिकार आहे. त्यामुळे शासनाने यापूर्वी अनेक कार्यक्रम हाती घेतले. जलस्वराज्य अभियान, जलस्वराज्य टप्पा 2, राष्ट्रीय पेयजल योजना या त्यापैकीच म्हणाव्या लागतील. पंधरा वर्षांत या योजनांच्या माध्यमातून नदी, तलावातील पाणी गावागावात आले. अनेकांनी वैयक्तिक नळ जोडण्या घेतल्या. ज्यांना शक्‍य नाही त्यांच्यासाठी सार्वजनिक व्यवस्था करण्यात आली. पण, त्यानंतरही वैयक्तिक नळ जोडणी नसणाऱ्या कुटुंबाला मुबलक पाणी मिळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जल जीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला मोफत नळ जोडणी दिली जाणार आहे. 

पूर्वीची जलवाहिनी असणाऱ्या ठिकाणी मोफत कनेक्‍शन दिले जाईल. जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी 15 पेक्षा अधिक कुटुंब असतील, तर त्यांच्या मागणीवरुन नव्याने जलवाहिनी टाकण्याची तरतूद केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध केला आहे. अधिक रक्कम लागणाऱ्या ठिकाणी जल जीवन मिशनमधून तरतूद केली जाणार आहे. गडहिंग्लज तालुक्‍यात 90 गावे आहेत. या गावातील 16 हजार 148 कुटुंबांकडे वैयक्तिक नळ जोडणी नसल्याचे दिसून येते. आता जल जीवन मिशनमधून या कुटुंबांना मोफत नळ जोडणी मिळणार आहे. वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

दृष्टिक्षेपात आकडे... 
- गडहिंग्लजची कुटुंब संख्या....... 47,076 
- नळ जोडणी असणारी कुटुंब..... 30,928 
- नळ जोडणी नसणारी कुटुंब...... 16,148 

आधार लिंकमध्ये तिसरा 
सध्या वैयक्तिक नळ कनेक्‍शन असणाऱ्या कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक लिंक केला जात आहे. ग्रामपंचायतींच्या पातळीवर ही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये गडहिंग्लज तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 6 हजार 767 कुटुंबांचे आधार क्रमांक लिंक केले आहेत. उद्दिष्टाच्या 68.70 टक्के काम पूर्ण झाले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com