esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

fare hike announced after four years kolhapur marathi news

जिल्ह्यातील सुमारे बारा हजार रिक्षाचालकांना याचा फायदा होणार आहे.

रिक्षात बसताच क्षणी २२ रुपयांचे मीटर;  १ मेपासून होणार भाडेवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तब्बल चार वर्षांनी रिक्षाचालकांना आज भाडेवाढ जाहीर झाली. रिक्षाचे सुरवातीचे किमान भाडे २० वरून २२ रुपये करण्यात आले. तसेच तेथून पुढे प्रत्येक किलोमीटरचे भाडे १७ वरून १८ रुपये करण्यास मंजुरी दिली आहे. १ मेपासून ही भाडेवाढ लागू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली. 


जिल्ह्यातील सुमारे बारा हजार रिक्षाचालकांना याचा फायदा होणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सर्व बाबींचा विचार करून हकीम समितीच्या शिफारशीनुसार वाहनाची किंमत, घसारा, कर, विमा, दुरुस्ती देखभाल खर्च, महागाई निर्देशांक, इंधन खर्च या सर्व बाबींचा समावेश करून भाडेवाढ दिली आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी प्राधिकरणाची बैठक झाली होती.

हेही वाचा- ब्रेकिंग; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त, जिल्हाधिकारी प्रशासक

 प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई, सचिव पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सदस्य प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. त्यानंतर दरवाढ देण्याबाबतची मागणी केली होती. त्यामुळे ही दरवाढ केली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये रिक्षाभाडे वाढ केली होती. त्यानंतर पेट्रोल, गॅसचे दर वाढले. मेंटेनन्स्‌, इन्शुरन्स वाढला. यामुळे भाडेवाढ देणे आवश्‍यक असल्याचे प्राधिकरणाला दिसले. तसेच यापूर्वी इतर जिल्ह्यात रिक्षाभाडे वाढ दिली आहे. या सर्वांचा विचार करून भाडेवाढ दिल्याचे डॉ.अल्वारिस यांनी  सांगितले.

दृष्टिक्षेपात...
 सुरवातीचे किमान भाडे २० वरून २२ रुपये
 तेथून पुढे प्रत्येक किलोमीटरचे भाडे १७ वरून १८ रुपये
 मीटर कॅलिब्रेशनसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत 
 कॅलिब्रेशन केलेल्या रिक्षाधारकांसाठी नवीन दर १ मेपासून लागू 
 रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत दीडपट भाडे
 प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

संपादन- अर्चना बनगे

go to top